टी२० विश्वचषकाचा सामना श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यात होता. होबार्टमध्ये रविवारी (23 ऑक्टोबर) आयर्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर १२९ धावांचे लक्ष्य ठेवले आणि श्रीलंकेने एक गडी गमावून हे लक्ष्य गाठले. दोन्ही संघ पात्रता फेरी जिंकून सुपर-१२ मध्ये पोहोचले आहेत. या पराभवानंतर आयर्लंडसाठी उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे, कारण त्यांना आता इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या संघांविरुद्ध खेळायचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात कुसल मेंडिसने श्रीलंकेसाठी ६८ धावांचे नाबाद अर्धशतक झळकावले. धनंजय डी सिल्वा आणि कुसल मेंडिस यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. येथून श्रीलंकेचा विजय निश्चित झाला. धनंजय आणि चारिथ असलंका या दोघांनी अनुक्रमे ३१ धावा करून बाद झाला. आयर्लंडकडून ग्रेथ डेलनीने एकमेव गडी बाद केला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडची सुरुवात खराब झाली आणि पॉवरप्लेमध्ये दोन गडी गमावून फक्त ४० धावाच करू शकले. यानंतरही टेक्टर वगळता कोणताही फलंदाज फार काही करू शकला नाही आणि आयर्लंडचा डाव कधीच वेग घेऊ शकला नाही. अखेर या संघाला आठ गडी राखून गमावून १२८ धावा करता आल्या. कर्णधार बलबर्नी एक, टकर १० आणि पॉल स्टर्लिन ३४ धावा करून बाद झाले. टेक्टरने सर्वाधिक ४५ धावा केल्या. श्रीलंकेकडून महेश तिक्षा आणि वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. लाहिरू कुमारा, बिनुरा फर्नांडो, चमिका करुणारत्ने आणि धनंजय डी सिल्वा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

या सामन्यात श्रीलंकेचा संघ एका बदलासह उतरला. दुखापतीमुळे या सामन्यात न खेळलेल्या पाठमू निसांकाऐवजी अशेन बंदाराला संघात स्थान देण्यात आले.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2022 sri lanka make winning start in super 12 beat ireland by 9 wickets avw
Show comments