ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक २०२२ सुरु झाला आहे. या स्पर्धेपूर्वी नामिबियाने आशियाई चॅम्पियन श्रीलंकेचा पराभव केला होता. त्याचवेळी, टी२० विश्वचषक २०२२ च्या दुसऱ्या दिवशी स्कॉटलंडने वेस्ट इंडिजचा पराभव करून मोठा धक्का दिला. शनिवारी न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलियासमोर असेल, या सामन्यापासून सुपर-१२ फेरीला सुरुवात होईल. भारतीय संघ २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. दरम्यान, भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी यांनीही या दोन संघ यंदा फायनल खेळतील अशी भविष्यवाणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फायनल भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणार

वास्तविक, माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या मते, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ टी२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत पोहोचतील. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू टॉम मूडी यानेही भारत आणि ऑस्ट्रेलियाची अंतिम फेरीत निवड केली आहे. सुनील गावसकर म्हणाले की, टीम इंडिया नक्कीच माझी पहिली पसंती आहे, पण सध्या मी ऑस्ट्रेलियात आहे, यामुळे मी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचे नावही घेईन. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडीने सर्वोतम ४ संघांचे भाकीत केले आहे.

हेही वाचा :  T20 World Cup 2022: टी२० विश्वचषक २०२२ च्या सुपर १२ मध्ये जाणाऱ्या दोन्ही संघांचे चित्र आज स्पष्ट होण्याची शक्यता 

टॉम मूडी यांनी ही भविष्यवाणी केली आहे

टॉम मूडीच्या मते, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन संघ त्यांच्या गटातून उपांत्य फेरीत पोहोचतील. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ त्यांच्या गटातून उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील. भारतीय संघ आपला पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे, याआधी टीम इंडियाने आपल्या पहिल्या अधिकृत सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ६ धावांनी पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात भारताकडून केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी शानदार फलंदाजी केली. न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सराव सामना मात्र पावसामुळे रद्द करावा लागला.