टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारताने आपल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव करून स्पर्धेतील विजयी मालिका कायम ठेवली. विराट कोहली, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकानंतर भुवनेश्वर कुमारच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने एकतर्फी सामन्यात नेदरलँड्सचा ५६ धावांनी पराभव केला.

नेदरलँड्वरील विजयासह, भारत चालू स्पर्धेच्या सुपर-१२ टप्प्यात सलग दोन सामने जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. गट १ मध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंका, तर गट २ मध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.

ग्रुप १ मध्ये, न्यूझीलंड वगळता सर्व संघांनी खेळलेल्या दोन सामन्यांपैकी एक गमावला आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांपैकी एक जिंकला आहे, तर अफगाणिस्तान विरुद्धचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. त्यामुळे या सामन्यात त्यांनी एका गुणावर समाधानी रहावे लागले.

भारताशिवाय गट २ मध्ये कोणत्याही संघाला सलग दोन सामने जिंकता आलेले नाहीत. गट 2 मध्ये झिम्बाब्वे आणि पाकिस्तान वगळता सर्व संघांनी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत, परंतु येथे आफ्रिका आणि झिम्बाब्वे वगळता सर्व संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आफ्रिकेचा झिम्बाब्वेविरुद्धचा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. झिम्बाब्वे आणि पाकिस्तान त्यांचा दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत, त्यापैकी जो संघ जिंकेल तो स्पर्धेतील दोन सामन्यांमध्ये पहिला विजय मिळवेल.

हेही वाचा – IND vs NED T20 World Cup: विराट-सुर्यकुमारची शानदार खेळी! भारताचा दुबळ्या नेदरलँड्सवर ५६ धावांनी दणदणीत विजय