१६ ऑक्टोबरपासून टी२० विश्वचषकाला ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवात झाली असून पात्रता फेरीतील सामने आणि सराव सामने या आठवड्यात खेळले जात आहेत. सुपर-१२चे सामने हे २२ ऑक्टोबरपासून सुरु होणार असून २३ तारखेला भारत वि पाकिस्तान सामन्याने टीम इंडियाची सुरुवात होणार आहे. पण यादरम्यान संघाने सराव सामने खेळले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिला सराव सामना जिंकल्यानंतर भारताला आज दुसरा सराव सामना न्यूझीलंडसोबत खेळायचा आहे.

पहिल्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ६ धावांनी पराभव केला होता, त्यामुळे येथे टीम इंडिया इतर प्रयोग करण्यासाठी सज्ज असेल. कारण यानंतर टी२० विश्वचषकाची खरी परीक्षा सुरू होईल. पहिल्या सामन्यात केएल राहुल, सूर्यकुमार यादव आणि नंतर शेवटच्या षटकात मोहम्मद शमीचा चमत्कार पाहायला मिळाला. आता न्यूझीलंडविरुद्ध, टीम इंडियाला रोहित शर्मा, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार यांसारख्या मोठ्या खेळाडूंना चांगले प्रदर्शन करून दाखवण्याची ही शेवटची संधी असेल.

शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजांना येणारे अपयश ही टीम इंडियासाठी सतत डोकेदुखी ठरताना दिसत आहे. गेल्या अनेक सामन्यांत सतावत होते, अशात ऑस्ट्रेलियाविरुद्धची लढत अटीतटीच्या उंबरठ्यावर असताना अखेरचे षटक संघात प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करत असलेल्या मोहम्मद शमीला देण्याची योजना कर्णधार रोहिने केली होती. शमीनेही तीन बळी घेत विश्वास सार्थ ठरवताना स्वतःचाही आत्मविश्वास उंचावला होता. भारतीय संघ व्यवस्थापन ॠषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला अधिक पसंती देत आहे. आजच्या सामन्यात पंतलाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :   एमचेस जलद बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश, अर्जुन, विदित उपांत्यपूर्व फेरीत

यजमान ऑस्ट्रेलियाप्रमाणेच न्यूझीलंड देखील एक बलाढ्य संघ आहे आणि स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार देखील. अशात भारताला त्यांच्याविरुद्ध खेळल्यानंतर स्वतःची गुणवत्ता समजू शकणार आहे.

हेही वाचा :   बेन्झिमा बॅलन डी’ओरचा मानकरी

हवामान आणि खेळपट्टी

आजच्या सामन्यात हवामान कोरडं राहणार असून पावसाची कुठलीही शक्यता नाही. खेळपट्टी ही फलंदाजीसाठी अनुकूल असून १८० ते १९० धावा साधारण या मैदानाची सरासरी धावसंख्या आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सराव सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जात आहे, जिथे टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेला. भारतीय वेळेनुसार, भारत-न्यूझीलंड सराव सामना दुपारी १.३० वाजता सुरू होईल. टीम इंडियाचा हा दुसरा सराव सामना स्टार नेटवर्कवर प्रसारित केला जाईल, तसेच डिस्ने-हॉटस्टारवरून ऑनलाइन पाहता येईल.

Story img Loader