टी२० विश्वचषक २०२२ च्या सुपर १२ मध्ये पोहोचलेल्या दोन्ही संघांचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. आज पात्रता फेरीत अ गटाचे संघ एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत. अ गटात अव्वल स्थानावर असलेल्या नेदरलँड्सशी श्रीलंकेचा सामना सुरु असून त्याचा काय निकाल लागतो त्यावर सारी गणिते अवलंबून असणार आहेत. तर नामिबिया त्यांचा शेवटचा सामना युएई विरुद्ध दुपारी १.३० वाजता खेळणार आहे. पहिले दोन सामने गमावून यूएई अ गटातून बाहेर पडली असून आता फक्त श्रीलंका, नेदरलँड्स आणि नामिबियाला पुढची फेरी गाठण्याची संधी आहे.
श्रीलंका आणि नेदरलँड्स यांच्यात खेळल्या गेलेल्या आजच्या पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नेदरलँड्स पहिल्या दोन सामन्यांपैकी दोन जिंकून +०.१४९ नेट रनरेटसह अव्वल आहे. नेदरलँड्सने श्रीलंकेला हरवल्यास ते थेट सुपर १२ मध्ये जातील. त्याचबरोबर पराभवानंतरही श्रीलंकेच्या खेळाडूंच्या नजरा नामिबियावर राहणार आहेत. पुढील सामन्यात यूएईने नामिबियावर पलटवार केल्यास प्रकरण नेट रनरेटवर अडकेल.
दुसरीकडे, श्रीलंकेने नेदरलँड्सला हरवल्यास त्यांचेही चार गुण होतील, तर नेदरलँड्स आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या नजरा नामिबिया विरुद्ध यूएई सामन्यावर असतील. दुसऱ्या सामन्यात युएई जिंकल्यास, नेदरलँड आणि श्रीलंका हे सुपर ४ मध्ये पोहोचणारे दोन संघ बनतील, तर नामिबिया जिंकल्यास तिन्ही संघांचे प्रकरण नेट रनरेटवर अडकेल.