टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारतीय संघ तुफान फॉर्मात होता. भारताने उपांत्य सामन्यापूर्वी फक्त एक सामना गमावत बाद फेरीत प्रवेश केला होता. मात्र, उपांत्य सामन्यात त्यांची चांगलीच निराशा झाली. आयर्लंडकडून पराभूत होणाऱ्या बलाढ्य इंग्लंड संघाने भारताची दाणादाण उडवली. इंग्लंडने दहाच्या दहा विकेट्सने हा सामना आपल्या खिशात घातला आणि अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले.

टीम इंडियाचा टी२० विश्वचषक २०२२ मधील प्रवास संपला आहे. १० नोव्हेंबरला इंग्लंडकडून १० गडी राखून पराभव झाल्यानंतर भारताचे टी२० विश्वचषक खेळण्याचे स्वप्न भंगले. आता विश्वचषकाचा अंतिम सामना १३ नोव्हेंबरला इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. भारत हरल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचीही प्रतिक्रिया आली.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताच्या पराभवावर ट्विट करत रविवारी झालेल्या इंग्लंड-पाकिस्तान अंतिम सामन्याबद्दल सांगितले. पण इथे त्याने टीम इंडियाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ज्यावर भारतीय चाहत्यांच्या संतापाचा भडका उडाला आणि त्यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले.

हेही वाचा :   वरिष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीपासून ते परदेशी टी२० लीगपर्यंत; जाणून घ्या राहुल द्रविडच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

शाहबाज शरीफ काय म्हणाले

भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी भारतीय संघाची खिल्ली उडवली आहे. “तर या रविवारी हे आहे, १५२/० vs १७०/०”, अशा आशयाचे ट्विट करून शेजारी देशाच्या पंतप्रधानांनी रोहित ब्रिगेडवर निशाणा साधला. खरं तर २०२१च्या विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून असाच १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्या सामन्यात भारतीय संघाने शेजाऱ्यांना १५२ धावांचे आव्हान दिले होते, ज्याचा पाठलाग करताना बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानच्या जोडीने एकही गडी न गमावता १५२ धावा केल्या होत्या.

शाहबाज शरीफ यांच्या ट्विटवर लोक संतापले

पाकिस्तानी पंतप्रधानांच्या अशा ट्विटला भारतीय वापरकर्त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. काही वापरकर्त्यांनी लिहिले की, तुम्ही कोणाला सपोर्ट कराल, कारण तुमचे पैसे फक्त इंग्लंडमध्ये गुंतवले आहेत. काही ट्विटर युजर्सनी लिहिले की, तुम्ही पाकिस्तानचे पंतप्रधान आहात की पाकिस्तानचे पंतप्रधान कॉमेडियन? भारतीय वापरकर्त्यांनी शाहबाज शरीफ यांना १९७१ च्या युद्धाची आठवण करून दिली आणि तुमचा रेकॉर्ड ९३०००/० असल्याचे सांगितले. केवळ भारतीयच नाही तर पाकिस्तानी वापरकर्त्यांनीही शाहबाज शरीफ यांना ट्रोल केले आणि लिहिले की विश्वचषकाशिवाय देशावरही लक्ष केंद्रित करा.

Story img Loader