टी२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्धचा पराभव झाल्यानंतर टीम इंडियावर चौफेर टीका होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघाला आपल्या देशापासून ते परदेशापर्यंतचे माजी क्रिकेटपटू लक्ष्य करत आहेत. या एपिसोडमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनचे विधान सर्वात तीव्रतेने आले आहे. खरे तर, वॉनने स्पष्टपणे सांगितले की, “टीम इंडिया हा पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट कामगिरी करणारा संघ आहे.”
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये भारत हा सर्वात वाईट संघ आहे
टीम इंडियावर टीका करताना वॉर्न म्हणाला की, टी२० विश्वचषकामध्ये भारतीय संघ खूप पारंपारिक पद्धतीने क्रिकेट खेळत आहे.” आयसीसीच्या आणखी एका स्पर्धेत भारताची मोहीम निराशाजनक होती. यावेळी इंग्लंडने उपांत्य फेरीत माजी विजेत्या भारताचा १० गडी राखून पराभव केला. गेल्या हंगामातील सुपर-१२ फेरीत पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. मायकेल वॉनने ‘द टेलिग्राफ’मधील आपल्या स्तंभात म्हटले आहे की, “भारत हा इतिहासातील पांढर्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा संघ आहे.”
आयपीएलमधून काय शिकलात?
मायकेल वॉर्न पुढे बोलताना म्हणाला, “इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळायला जाणारा प्रत्येक खेळाडू म्हणतो की त्याने त्यांचा खेळ किती सुधारला आहे पण भारताने त्यातून काय मिळवले? २०११ मध्ये मायदेशात ५० षटकांचा विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाने असे कोणते यश मिळवले? काहीही नाही. भारत पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटच्या जुन्या शैलीत खेळत आहे जे ते वर्षानुवर्षे खेळत आले आहेत.” ऋषभ पंतचा प्रभावीपणे वापर न केल्याबद्दल वॉनने भारतीय संघ व्यवस्थापनावर टीका केली.
पंत आणि चहलकडे दुर्लक्ष झाले
इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणाला, “टीम इंडियाने ऋषभ पंतसारख्या खेळाडूचा पुरेपूर वापर केला नाही. ऐन उमेदीच्या काळात त्याचा वापर नाही करणार तर मग कधी करणार असा सवाल त्याने केला. त्याच्याकडे प्रतिभा असूनही तो किती टी२० क्रिकेट खेळतो यावर मला शंका आहे. भारताकडे खूप प्रतिभावान खेळाडू आहेत पण त्यांना खेळवण्याची योग्य प्रक्रिया नाही. बीसीसीआयने यावर एक प्लॅन ऑफ अॅक्शन तयार करून कसोटी, एकदिवसीय आणि टी२० अशा तिन्ही प्रकारतील क्रिकेटसाठी खेळाडूंची निवड करत त्यांना रोटेशन पद्धतीने खेळवणे गरजेचे आहे. “प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर दबाव टाकण्यासाठी त्याने पहिली पाच षटके कशी खेळली?”
यावरही वॉर्नने भाष्य केले. संघात अष्टपैलू खेळाडूंच्या कमतरतेचाही उल्लेख केला. वॉन म्हणाला, “१० किंवा १५ वर्षांपूर्वी भारतातील सर्व आघाडीचे फलंदाज थोडेसे गोलंदाजी करत होते. आत्ताच्या भारतीय संघात मात्र फक्त पाच गोलंदाजीचे पर्याय कसे असू शकतात? सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, वीरेंद्र सेहवाग आणि अगदी सौरव गांगुली यांसारखे फलंदाज गोलंदाजी देखील करत होते.”वॉनने असेही सांगितले की, “कोणताही फलंदाज गोलंदाजी करत नाही, त्यामुळे कर्णधाराकडे फक्त पाच पर्याय शिल्लक राहतात त्यामुळे तो हतबल होतो.”
टीम इंडियाच्या गोलंदाजीवर प्रश्न विचारला त्यावेळी तो म्हणाला, “आम्हा सर्वांना टी२० क्रिकेटच्या आकडेवारीवरून माहित आहे की, संघाला दोन्ही बाजूंना चेंडू वळवणारा फिरकी गोलंदाज हवा आहे. भारताकडे लेग स्पिनर भरपूर आहेत. पणे ते सध्या कुठे आहेत ते? वॉनने रोहित शर्माच्या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.