टी२० विश्वचषक २०२२ मध्ये बांगलादेशला भारताविरुद्ध डकवर्थ लुईस नियमानुसार ५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनला रोमहर्षक सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. शाकिब अल हसनने म्हटले आहे की, त्यांचा संघ भारताविरुद्धचा सामना प्रत्येक वेळी जिंकण्याच्या जवळ येतो परंतु अंतिम रेषा ओलांडू शकत नाही.

सामना संपल्यानंतर शकीब म्हणाला, “आम्ही भारताविरुद्ध खेळतो तेव्हा सामना जिंकण्याच्या जवळ असतो, पण आम्ही अंतिम ध्येय गाठू शकलो नाही. हीचं आमची शोकांतिका राहिली आहे. हा एक उत्तम सामना झाला  ज्याचा दोन्ही संघांनी आनंद घेतला आणि आम्हाला तेच हवे होते. शेवटी कोणतरी जिंकणार, कोणीतरी हरणार त्यामुळे सामना हा रंजक झाला आणि आम्ही आमच्याकडून पूर्ण क्षमतेने लढलो यातच आम्हाला समाधान आहे. लिटन दास हा आमचा सर्वोत्तम फलंदाज आहे. पॉवरप्लेमध्ये लिटन दासने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यामुळे फलंदाजी करताना आम्ही असे वाटत होते की, आम्ही लक्ष्याचा पाठलाग करू शकतो, असा आत्मविश्वास त्याने आम्हाला दिला. त्याने मैदानाची लहान बाजू टार्गेट करत चौकार आणि षटकार मारले.”

India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
Sanju Samson reach 39th position in ICC T20I rankings
Sanju Samson : संजू सॅमसनची आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप! सलग दोन सामन्यात शतक झळकावत पटकावले ‘हे’ स्थान

हेही वाचा :   T20 World Cup 2022: ‘पावसाने खेळाची दिशा…’शोएब अख्तरने केली बांगलादेशच्या पराभवाची कारणमीमांसा

भारताचे वरच्या फळीतील -४ फलंदाज अतिशय धोकादायक: शकिब

शाकिब पुढे म्हणाला, ‘जर तुम्ही भारताचे वरच्या फळीतील प्रमुख चार फलंदाज पहिले तर ते खूप धोकादायक आहेत. त्या ४ खेळाडूंना लवकर बाद करण्याची आमची योजना होती आणि म्हणून आम्ही तस्किन अहमदला सुरुवातीस चारही षटके सलग टाकायला दिली. दुर्दैवाने तस्किनला विकेट घेता आली नाही पण त्याने कसून गोलंदाजी केली. या विश्वचषकात आम्ही अगदी निवांत आहोत आणि क्रिकेटबद्दल जास्त बोलत नाही. आम्हाला अजून एक सामना खेळायचा आहे आणि आम्ही त्यावर लक्ष केंद्रित करू इच्छितो.”

हेही वाचा :   T20 World Cup 2022: ॠषभ पंतचा संघात समावेश न झाल्याने होतायेत सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा बांगलादेशवर पाच धावांनी निसटता विजय झाला असून उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. भारताचा पुढील सामना हा रविवारी झिम्बाब्वे बरोबर असणार आहे. संध्या ग्रुप मध्ये भारत अव्वलस्थानी आहे. जर पाकिस्ताने दक्षिण आफ्रिकेला हरवले तर यात फार मोठे काही बदल घडणार नाहीत. पण यामुळे टीम इंडिया ग्रुपमध्ये अव्वलस्थानी कायम राहू शकते.