टी२० विश्वचषक २०२२ मध्ये बांगलादेशला भारताविरुद्ध डकवर्थ लुईस नियमानुसार ५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनला रोमहर्षक सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. शाकिब अल हसनने म्हटले आहे की, त्यांचा संघ भारताविरुद्धचा सामना प्रत्येक वेळी जिंकण्याच्या जवळ येतो परंतु अंतिम रेषा ओलांडू शकत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सामना संपल्यानंतर शकीब म्हणाला, “आम्ही भारताविरुद्ध खेळतो तेव्हा सामना जिंकण्याच्या जवळ असतो, पण आम्ही अंतिम ध्येय गाठू शकलो नाही. हीचं आमची शोकांतिका राहिली आहे. हा एक उत्तम सामना झाला ज्याचा दोन्ही संघांनी आनंद घेतला आणि आम्हाला तेच हवे होते. शेवटी कोणतरी जिंकणार, कोणीतरी हरणार त्यामुळे सामना हा रंजक झाला आणि आम्ही आमच्याकडून पूर्ण क्षमतेने लढलो यातच आम्हाला समाधान आहे. लिटन दास हा आमचा सर्वोत्तम फलंदाज आहे. पॉवरप्लेमध्ये लिटन दासने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यामुळे फलंदाजी करताना आम्ही असे वाटत होते की, आम्ही लक्ष्याचा पाठलाग करू शकतो, असा आत्मविश्वास त्याने आम्हाला दिला. त्याने मैदानाची लहान बाजू टार्गेट करत चौकार आणि षटकार मारले.”
भारताचे वरच्या फळीतील -४ फलंदाज अतिशय धोकादायक: शकिब
शाकिब पुढे म्हणाला, ‘जर तुम्ही भारताचे वरच्या फळीतील प्रमुख चार फलंदाज पहिले तर ते खूप धोकादायक आहेत. त्या ४ खेळाडूंना लवकर बाद करण्याची आमची योजना होती आणि म्हणून आम्ही तस्किन अहमदला सुरुवातीस चारही षटके सलग टाकायला दिली. दुर्दैवाने तस्किनला विकेट घेता आली नाही पण त्याने कसून गोलंदाजी केली. या विश्वचषकात आम्ही अगदी निवांत आहोत आणि क्रिकेटबद्दल जास्त बोलत नाही. आम्हाला अजून एक सामना खेळायचा आहे आणि आम्ही त्यावर लक्ष केंद्रित करू इच्छितो.”
अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा बांगलादेशवर पाच धावांनी निसटता विजय झाला असून उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. भारताचा पुढील सामना हा रविवारी झिम्बाब्वे बरोबर असणार आहे. संध्या ग्रुप मध्ये भारत अव्वलस्थानी आहे. जर पाकिस्ताने दक्षिण आफ्रिकेला हरवले तर यात फार मोठे काही बदल घडणार नाहीत. पण यामुळे टीम इंडिया ग्रुपमध्ये अव्वलस्थानी कायम राहू शकते.