टी२० विश्वचषक २०२२ मध्ये, वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यात आज होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल मैदानावर सामना झाला. या सामन्यातील विजेता २०२२ च्या टी२० विश्वचषकातील सुपर-१२ मध्ये पोहोचणार असल्याने वेस्ट इंडीज च्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा होता. मात्र वेस्ट इंडिज संघाला खूप मोठा धक्का बसला आहे. दोनवेळची चॅम्पियन वेस्ट इंडिज आयर्लंडकडून पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
टी२० विश्वचषकाच्या ११व्या सामन्यात आयर्लंडने वेस्ट इंडिजचा ९ गडी राखून पराभव केला. या विजयासह आयर्लंडचा संघ टी२० विश्वचषकाच्या सुपर-१२ मध्ये पोहोचला आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिज संघाची मोठी निराशा झाली असून तो या विश्वचषकातून बाहेर पडला आहे. वेस्ट इंडिजने आयर्लंडसमोर विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. विंडीज संघाकडून ब्रेंडन किंगने सर्वाधिक ६२ धावांची खेळी खेळली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. आयर्लंडकडून गॅरेथ डेलनीने चार षटकांत १६ धावांत ४ फलंदाज बाद केले.
धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या आर्यलंडने ४.२ षटकातच ५० धावा केल्या. त्यांचा कर्णधार-सलामीवीर अँड्रयू बालबर्नी आणि पॉल स्टर्लिंग यांनी पहिल्या गड्यासाठी ४५ चेंडूत ७३ धावांची भागीदारी रचली. बालबर्नीने २३ चेंडूत ३७ धावा केल्या. तसेच स्टर्लिंगने ३२ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने शेवटपर्यंत फलंदाजी करत ४८ चेंडूत ६६ धावा केल्या.
तत्पूर्वी, वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आम्ही तुम्हाला सांगतो की या सामन्यातील विजेता थेट सुपर-१२ फेरीसाठी पात्र ठरेल आणि पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर जाईल. येथील समीकरणे अगदी सोपी आहेत. याआधी काल श्रीलंका आणि नेदरलँड्स पात्र ठरले आहेत. आज कोणते दोन संघ पात्र ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वेस्ट इंडीज की आयर्लंड? झिम्बाब्वे की स्कॉटलंड? दिवसाचा दुसरा सामना झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्यात होणार आहे.
२०२२ चा विश्वचषक हा काही संघांसाठी चांगला गेला तर काहींसाठी वाईट. पण दोनवेळची वेस्ट इंडीजसाठी ही खूप मोठी नामुष्की ठरली आहे. ज्यांनी २ एकदिवसीय विश्वचषक, एक चॅम्पियन ट्रॉफी आणि दोन टी२० विश्वचषक असे त्यांच्या नावावर असताना हा पराभव खूप मोठा धक्का आहे. वेस्ट इंडीज प्रवास मात्र आज येथेच थांबला आहे.