भारताचा माजी कर्णधार विराट कोहलने बांगलादेशच्या सामन्यानंतर एक खास भेट प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला दिली. तीन नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सुपर १२ फेरीमधील सामन्यात विजय मिळवल्यानंतर कोहलीने लिटन दासला आपली बॅट भेट म्हणून दिली. अॅडलेडच्या मैदानावरील रंजक सामन्यानंतर कोहलीने लिटनच्या फलंदाजीचं कौतुक करत त्याला हे खास गिफ्ट दिलं.

नक्की वाचा >> T20 World Cup : …तर पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका उपांत्यफेरीत! पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेन्शन वाढलं; पाहा Points Table

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
mahesh gaikwad
कल्याण : फरार मारेकऱ्यांना पकडण्यासाठी महेश गायकवाड यांचे २५ हजार रूपयांचे बक्षिस
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
IND W vs IRE W Jemimah Rodrigues century helps Indian womens team register highest ODI score against Ireland
IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम

भारताने १८४ धावांचा डोंगर उभारल्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना लिटनने भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. भारतीय गोलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या लिटनने २१ चेंडूंमध्ये अर्धशतक साजरं केलं. लिटनच्या या फलंदाजीमुळे डकवर्थ-लुईस-स्टेन पद्धतीनुसार बांगलादेशचा संघ निर्धारित धावसंख्येच्या पुढे होता. सात षटकांनंतर पावसामुळे सामना थांबला तेव्हाही बांगलादेशचा संघ आघाडीवर होता.

नक्की वाचा >> Ind vs Ban: बॅट, बॉलऐवजी हातात ब्रश घेत ‘त्याने’ भारतीय संघाला जिंकून दिला सामना; जाणून घ्या या व्यक्तीनं नेमकं केलं तरी काय

लिटनने २७ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या. के. एल. राहुलच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे पावसानंतर सामना सुरु झाल्याच्या दुसऱ्याच चेंडूवर लिटन धावबाद झाला. लिटन बाद झाल्यानंतर बांगलादेशला डाव सावरता आला नाही आणि ते पाच धावांनी पराभूत झाले. या सामन्यामध्ये विराटला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सामन्यानंतर विराटने स्वइच्छेने लिटनला आपली बॅट भेट दिली.

नक्की पाहा >> Ind vs Ban: के. एल. राहुलचा हा थ्रो ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट; Rain Break नंतर दुसऱ्याच चेंडूवर काय घडलं पाहा Video

“आम्ही डायनिंग हॉलमध्ये बसलेलो असताना विराट कोहली आला आणि त्याने लिटनला बॅट भेट म्हणून दिली,” असं जलाल युनूस यांनी सांगितल्याचं वृत्त ‘बीडीक्रिकटाइम बांगला’ने दिलं आहे. युनूस हे बांगलादेश क्रिकेट संघाचे व्यवस्थापक आहेत. युनूस यांनी विराटच्या या खेळाडूवृत्तीचंही कौतुक केलं आहे. “माझ्या मते लिटनसाठी हा क्षण फार प्रेरणादायी आहे,” असं युनूस यांनी म्हटलं.

नक्की वाचा >> विराटने ‘फेक फिल्डींग’ केली म्हणजे नेमकं काय केलं? त्याच्यावर कारवाई होऊ शकते का? भारताला बसणार का फटका?

युनूस यांनी लिटनच्या फलंदाजीचंही कौतुक केलं. “लिटन हा उत्तम फलंदाज आहे. त्याने अनेक सुंदर फटके मारताना आम्ही पाहिलं आहे. तो कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्येही उत्तम खेळतो. नुकतीच त्याने आपली टी-२० क्रिकेटमधील कारकिर्द सुरु केली आहे,” असं युनूस म्हणाला.

Story img Loader