आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सुपरफॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत पाकिस्तान आणि नेदरलॅंड्सविरुद्धच्या साामन्यात विराट कोहली शानदार खेळी करत नाबाद राहिला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानविरुद्ध ८२ धावांची खेळी साकारताना विजय खेचून आणला. या विराट कोहलीच्या जादुई खेळीबद्दल महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल यांनी कौतुक केले आहे.
चॅपेलने पाकिस्तानविरुद्ध कोहलीची नाबाद ८२ धावांची खेळी ही टी-२० क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी असल्याचे म्हटले आहे. या सामन्यात कोहलीने एक संस्मरणीय खेळी खेळली आणि टीम इंडियाने पाकिस्तानला चार विकेट्सने हरवले.
ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पुढे विराट कोहलीची तुलना माजी भारतीय कर्णधार टायगर पतौडीशी केली. तसेच त्यांनी सांगितले की, देवाच्या योजनेच्या पलीकडे त्याची कल्पनाशक्ती घेण्याचे धैर्य आणि बुद्धिमत्ता फक्त त्याच्याकडे होती. इतकेच नाही तर ग्रेग चॅपेल यांनी कोहलीची स्तुती करण्यासाठी हिंदू पौराणिक कथांमधील सर्वात आदरणीय ग्रंथ भगवद्गीतेचा हवाला देऊन म्हटले की एमसीजीमधील कोहलीची खेळी ही देवाच्या गाण्यासारखी होती.
मी माझ्या आयुष्यात अशी खेळी पाहिली नाही – ग्रेग चॅपेल
७४ वर्षीय चॅपेल यांनी सांगितले की, त्याने आपल्या आयुष्यात इतकी चांगली खेळी पाहिली नव्हती. ग्रेग चॅपेल यांनी द एजसाठी त्यांच्या स्तंभात लिहिले: भगवद्गीता हा पवित्र ग्रंथ आहे, जो हिंदू धर्माचा संपूर्ण तपशील देतो. जर आपण भगवद्गीतेच्या शाब्दिक स्वरूपाबद्दल बोललो तर त्याचा अर्थ “देवाचे गीत” आहे. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध अशी खेळी खेळली जी “देवाच्या गाण्याच्या अगदी जवळ होती. जी टी-२० क्रिकेटमध्ये क्वचितच खेळली गेली असेल.
कोहलीने एमसीजीच्या हिरव्या गालिच्यावर पाकिस्तानच्या उत्कृष्ट गोलंदाजी आक्रमणाला छेडले आणि त्याचे तुकडे तुकडे केले. मी माझ्या आयुष्यात असा बदल कधीच पाहिला नाही. कोहलीच्या खेळीमुळे मला खूप आनंद झाला, कारण ती गेल्या १४५ वर्षांतील कसोटी क्रिकेटमधील सर्वात खंबीर समर्थक आणि प्रवर्तकांपैकी एकाने खेळली होती.”