टी२० विश्वचषकात ग्रुप बी मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात ॲडलेडमध्ये सामना खेळला गेला. अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा बांगलादेशवर पाच धावांनी निसटता विजय झाला असून उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार धावांचे लक्ष हे १६ षटकात १५१ करण्यात आले होते. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. या विजयावर सुरेश रैनाने नाराजी व्यक्त करत संघाला खडेबोल सुनावले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरेश रैना भारतीय संघाच्या खराब कामगिरीवर म्हणाला की, “ या सामन्यात बांगलादेशने ज्या प्रकारे झुंज दिली, जर पावसाने खेळात व्यत्यय आणला नसता तर सामना त्यांच्या बाजूने झुकला होता. पहिल्या सात षटकांमध्ये लिटन दासने भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. यातून टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बोध घ्यायला हवा. रोहित शर्मानेही सामन्यानंतर बांगलादेश भारतापेक्षा सरस असल्याचे मान्य केले. टीम इंडियासाठी हा वेक अप कॉल होता आणि याकडे रोहित ब्रिगेडला गांभीर्याने घ्यावे लागेल. त्यांना उपांत्य आणि अंतिम फेरीत सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करणे आवश्यक आहे. कारण त्यांच्यासमोर अधिक कडवे आव्हान आहे,”असे रैनाने आज तकशी सवांद साधताना विधान केले.

टीम इंडियाच्या फलंदाजीवर बोलताना रैना म्हणाला की, “भारताचे आघाडीचे ५ फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. रोहित शर्माही धावा करत आहे. लोकेश राहुल फॉर्ममध्ये येणं हे टीम इंडियासाठी खूप चांगली गोष्ट आहे. एका सामन्यानंतर आम्ही सेमीमध्ये पोहोचू. विराट कोहलीचा चांगला फॉर्म सुरू आहे, सूर्यकुमार चांगला खेळत आहे. हार्दिक पांड्याही चांगली फलंदाजी करत आहे.”

हेही वाचा :   T20 World Cup 2022: न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये दाखल! आयर्लंडचा ३५ धावांनी केला पराभव

माजी डावखुरा फलंदाज रैनाच्या म्हणण्यानुसार, झिम्बाब्वेविरुद्ध भारताने लेग-स्पिनर युझवेंद्र चहलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला पाहिजे. “अश्विनने मारलेला षटकारही भारतासाठी महत्त्वाचा होता. कदाचित त्यामुळेच संघ व्यवस्थापन अश्विनला पाठीशी घालत असेल. पण मला वाटते की चहलला संघात पुनरागमन करावे लागेल. पुढचा सामना मेलबर्नमध्ये आहे, जे एक मोठे मैदान आहे,”

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2022 wakeup call for team india suresh raina gave harsh words to the indian team avw