टी२० विश्वचषक २०२२ मध्ये बांगलादेशला भारताविरुद्ध डकवर्थ लुईस नियमानुसार ५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनला रोमहर्षक सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. शाकिब अल हसनने म्हटले आहे की, त्यांचा संघ भारताविरुद्धचा सामना प्रत्येक वेळी जिंकण्याच्या जवळ येतो परंतु अंतिम रेषा ओलांडू शकत नाही.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने कालच्या सामन्याबद्दल येथे सांगितले की, “संघाने अर्शदीप सिंगला डेथ ओव्हर्ससाठी तयार केले आहे, जे जखमी जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत प्रभावी ठरत आहे. कर्णधाराच्या मते, अर्शदीप सिंग आणि अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्यात एक पर्याय असायचा. बांगलादेशविरुद्धच्या पाच धावांनी विजय मिळवताना २३ वर्षीय अर्शदीपने डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केली. बांगलादेशला शेवटच्या षटकात २० धावांची गरज होती. नुरुल हसनने अर्शदीपच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारला पण तो शांत राहिला आणि त्याने शानदार यॉर्कर चेंडू टाकून भारताला विजय मिळवून दिला.
सामन्यानंतर रोहित शर्माने आपल्या निर्णयाबद्दल खुलासा केला. त्याने शमीऐवजी अर्शदीपला शेवटचे षटक का दिले यावर त्याने उत्तर दिले. तसेच जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत संघ व्यवस्थापनाने टीम इंडियासाठी आपला पर्याय तयार केल्याचे रोहितच्या विधानावरून दिसून येते आणि तो पर्याय फक्त अर्शदीप सिंग आहे. रोहित म्हणाला की, “जेव्हा अर्शदीप संघात आला तेव्हा आम्ही त्याला डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यास सांगितले. बुमराह संघात नाही आणि अशा परिस्थितीत हे काम कोणासाठीही सोपे नव्हते. युवा गोलंदाजासाठी अशी भूमिका निभावणे सोपे नाही पण आम्ही त्याला तयार केले आहे.”
कर्णधार रोहित पुढे म्हणाला की, “गेल्या ८-९ महिन्यांपासून तो ही भूमिका पार पाडत आहे. जर कोणी सतत कोणतेही काम करत असेल तर मी त्याला पाठिंबा देतो. आमच्याकडे शमी आणि अर्शदीपचे पर्याय होते. मी शांत होतो पण त्याचवेळी थोडी अस्वस्थताही होती. एक संघ म्हणून तुमची रणनीती अंमलात आणण्यासाठी शांत राहणे महत्त्वाचे आहे. कमी षटकांच्या सामन्यात कोणताही संघ जिंकू शकतो. जेव्हा पावसानंतर खेळ सुरू झाला तेव्हा आम्ही संयम राखला आणि शेवटी आम्ही विजय खेचून आणलाच.”