T20 World Cup 2024: आयपीएल २०२४ च्या समारोपानंतर आता सर्वांचे लक्ष आगामी टी-२० विश्वचषक २०२४ कडे असणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या यजमानपदाखाली खेळवल्या जाणाऱ्या या विश्वचषकासाठी हळूहळू सर्व संघ कॅरेबियनमध्ये दाखल होत आहेत. भारतीय संघाची एक तुकडी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाली आहे, तर दुसरी तुकडी न्यूयॉर्कसाठी रवाना झाली आहे. पण या दरम्यान चॅम्पियन ऑस्ट्रेलिया संघ मोठ्या पेचात अडकला आहे. त्यांच्या १५ सदस्यीय वर्ल्डकप संघातील फक्त ९ खेळाडू सध्या उपस्थित आहेत. त्यामुळे कोचिंग स्टाफची माणसं सराव सामने खेळतील असे चित्र दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्ल्डकपला २ जूनपासून सुरुवात होणार असली तरी त्यापूर्वी सराव सामने सुरू खेळवले जाणार आहेत. २७ मे पासून सराव सामने सुरू होणार आहेत आणि भारतीय संघ १ जून रोजी सामना खेळताना दिसणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ २९ मे रोजी नामिबियासोबत सराव सामना खेळताना दिसणार आहे. पण संघातील ११ खेळाडू अजून वर्ल्डकप संघात दाखल झालेल नाही. सध्या अमेरिकेत असलेल्या संघात फक्त ९ खेळाडू आहेत, बाकीचे खेळाडू पुढील काळात संघाबरोबर जोडले जातील, अशी माहिती मिळाली आहे. काही ऑस्ट्रेलियन खेळाडू २६ मे पर्यंत भारतात आयपीएल खेळत होते, तर काही खेळाडू सध्या विश्रांती घेत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाच्या तयारीला फटका बसू शकतो.

हेही वाचा – लुट पुट गया…आंद्रे रसेल आणि अनन्या पांडेचा डान्स करतानाचा व्हीडिओ व्हायरल,कोच चंद्रकांत पंडितही थिरकले

ऑस्ट्रेलिया कोचिंग स्टाफसह वॉर्म अप सामने खेळणार

पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल स्टार्क २६ मे रोजी झालेल्या आयपीएल फायनलमध्ये खेळत होते, तर ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरून ग्रीन हे एलिमिनेटरनंतर मायदेशी परते. परंतु सध्या ते विश्रांती घेत आहेत. हे पाच खेळाडू बार्बाडोस येथे थेट विश्वचषक संघात सामील होतील. जिथे त्यांचा पहिला सामना ओमानशी होईल. दरम्यान, कर्णधार मिचेल मार्श स्वत: सराव सामन्यांमध्ये गोलंदाजी करणार नसल्याचेही वृत्त आहे, कारण तो आयपीएलमध्ये झालेल्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत आहे.

हेही वाचा – हार्दिक-नताशाच्या घटस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, भाऊ कृणालच्या पोस्टवरील पंड्याच्या बायकोची कमेंट व्हायरल

मात्र मार्श दोन्ही सामन्यात फलंदाज म्हणून खेळणार आहे. आता फक्त नऊ खेळाडू उपलब्ध आहेत. याचा अर्थ असा की ऑस्ट्रेलियाला कोचिंग स्टाफच्या सदस्यांना सराव सामन्यांदरम्यान मैदानात उतरावे लागणार आहे. ब्रॅड हॉज या स्पर्धेसाठी सपोर्ट स्टाफमध्ये सामील झाला आहे तर मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड, राष्ट्रीय निवडकर्ता जॉर्ज बेली आणि सहाय्यक प्रशिक्षक आंद्रे बोरोवेक यांना सराव सामन्यासाठी मैदानात उतरावे लागणार आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2024 australia have 9 players available for warm up matches coaching staff may play bdg
Show comments