टी-२० विश्वचषक २०२४ मधील २४ व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि नामिबियाचे संघ भिडले होते. बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा संघ साधारण नामिबियावर भारी पडेल, याची सामन्याआधीच कल्पना होती आणि नेमकं तेच घडलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चमकदार कामगिरी करत आपल्या विरोधी संघाला १७ षटकांत अवघ्या ७२ धावांत गुंडाळले. इतकेच नव्हे तर लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांनी पॉवरप्लेमध्ये म्हणजेच ५.४ षटकांत १ गडी गमावून हे सहज लक्ष्य गाठले.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात नामिबिया संघाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. खरं तर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पहिली धाव घेण्यासाठी कर्णधाराला एकूण १७ चेंडूंचा सामना करावा लागला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच फलंदाजाला आपले धावांचे खाते उघडण्यासाठी १७ चेंडूंचा सामना करावा लागला आहे. यामुळेच इरॅस्मसच्या नावे टी-२० फॉरमॅटचा हा लज्जास्पद विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Steve Smith Smashes 34th Test Century and 11th Hundred Against India Most By any Batter IND vs AUS
IND vs AUS: स्टिव्ह स्मिथचं ऐतिहासिक कसोटी शतक, भारताविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
Indian Women On Course For Clean Sweep Against West Indies
भारताचे निर्भेळ यशाचे लक्ष्य; वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आज
PAK vs SA Corbin Bosch takes wicket on first ball of Test career to create new record
PAK vs SA: पदार्पणाच्या कसोटीत आफ्रिकेच्या खेळाडूने पहिल्याच चेंडूवर केला मोठा विक्रम, १३५ वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO

हेही वाचा – “नालायक माणूसचं हे करू शकतो”, अकमलने माफी मागूनही भज्जीची बोचरी टीका, VIDEO व्हायरल

नामिबियाच्या कर्णधाराच्या नावे लाजिरवाणा रेकॉर्ड

या संथ खेळीसह, कांगारू संघाविरुद्ध नामिबियासाठी गेरहार्ड इरास्मस हा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. आपल्या संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने एकूण ४३ चेंडूंचा सामना केला. दरम्यान, तो ८३.७२ च्या स्ट्राइक रेटने ३६ धावा करण्यात यशस्वी झाला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ४ चौकार आणि १ षटकार आला. गेरहार्ड इरास्मसने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये आतापर्यंत त्याच्या संघासाठी एकूण ६० सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याने ५८ डावात ३२.७३ च्या सरासरीने आपल्या बॅटने १४४० धावा केल्या आहेत. गोलंदाजी करताना त्याने समान सामन्यांच्या ३९ डावांमध्ये १३.१३ च्या सरासरीने ४७ यश मिळवले आहे.

हेही वाचा – IND vs PAK: “जर आपण ऑलआऊट होऊ शकतो, तर…” रोहितचा मास्टरस्ट्रोक अन् भारताचा विजय, सामन्यानंतर सांगितलं मैदानात काय घडलं?

ऑस्ट्रेलियन संघाने बुधवारी ८६ चेंडू बाकी असताना एकतर्फी झालेल्या सामन्यात नामिबियाचा ९ गडी राखून पराभव केला. अँटिगा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात नामिबियाने प्रथम फलंदाजी केली आणि संपूर्ण संघ १७ षटकांत ७२ धावांत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने केवळ ५.४ षटकांत एक विकेट गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात विजयाची हॅट्ट्रिक केली आणि सुपर८ फेरी गाठणारा दुसरा संघ ठरला. यापूर्वी, नेपाळ आणि श्रीलंका यांच्यातील सामना रद्द करण्यात आला होता, ज्यामुळे दक्षिण आफ्रिका सुपर८ मध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला होता.

Story img Loader