T20 World Cup 2024 USA Cricketer Harmeet Singh: मुंबईकर हरमीत सिंहची टी-२० विश्वचषक २०२४ साठी अमेरिकेच्या राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. भारतीय खेळाडू ते वर्ल्डकपसाठी एखाद्या देशाच्या राष्ट्रीय संघात स्थानमिळेपर्यंतचा हरमीतचा प्रवास हा खाचळग्यांचा होता, त्याच्या या प्रवासाचा आढावा घेऊया.

भारताचा १९ वर्षांखालील माजी क्रिकेटपटू गेल्या एका वर्षापासून अमेरिकेत राहत असून क्रिकेट खेळणं आणि क्रिकेटचे प्रशिक्षण देणे यासह अनेक विविध नोकऱ्या करत आपले जीवन जगत होता. यासोबत भारतात क्रिकेट खेळत असताना कारकिर्दीच्या सुरूवातीच्या टप्प्यावर आलेल्या त्या वाईट अनुभवांना विसरण्याचा प्रयत्न करत होता, इतक्यात हरमीतचा फोन वाजला. २०२१ मधील ती कधीच न विसरू शकणारी घटना होती. हरमीतच्या आईला करोनामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यासह त्यांना श्वासोच्छवासाचा गंभीर त्रासही होत होता. हरमीतला कसंही करून एक रेमडेसिव्हिर इंजेक्शनची व्यवस्था करण्यास कळवण्यात आले. त्याने या इंजेक्शनची व्यवस्थाही केली पण त्याच्या काही फायदा झाला नाही.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman Batter to hit List A double hundred
१३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन

हेही वाचा – T20 WC 2024: युगांडा संघाची जर्सी पाहून ICCने उचललं मोठं पाऊल, बदल करण्याचे दिले आदेश; काय आहे नेमकं कारण?

“हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण होता, मी आईच्या अंतिम संस्कारालाही जाऊ शकलो नाही, व्हिडिओ कॉलवर तिचे संपूर्ण अंतिम संस्कार पाहिले. मी सुन्न पडलो होतो; जुन्या आठवणी ते जुने दिवस एकामागून एक माझ्या नजरेसमोरून तरळत होते. ती मला रोज मैदानावर घेऊन जायची, हा प्रवास आम्ही एकत्र जगलो होतो. तिला आजचा हा दिवस दिसला नाही याचे मला वाईट वाटते,” हरमीतला बोलता बोलता भरून आलं.

अखेरीस तो दिवस आता आला. एकेकाळी ऑस्ट्रेलियन दिग्गज इयान चॅपेल यांच्यापेक्षाही प्रतिभावान आणि आश्वासक खेळाडू असे म्हटले जाणारा हरमीत आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. परंतु यात मोठा फरक आहे तो म्हणजे, T20 विश्वचषक स्पर्धेत हरमीत भारताविरुद्ध त्याचा नवीन देश अमेरिकेकडून खेळणार आहे. ३१ वर्षीय डावखुऱ्या फिरकीपटूसाठी हा असा काहीसा प्रवास आहे.

२०२१ मधील त्या फोन कॉलनंतर अजून एका कॉलने हरमीतचे आयुष्य बदलले. “पक्षपातीपणा” आणि ” संघातील निवडीमागील राजकारण” याला कंटाळल्याने आणि अमेरिकेकडून क्रिकेट खेळण्याची संधी मिळाल्याने त्या कॉलनंतर हरमीतने अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेची संधी म्हणजे हरमीतसाठी आशेचा किरण होती. अंधारात चाचपडणाऱ्या माणसालाच या किरणाचं महत्त्व उमगू शकतं. चॅपेल यांच्या कौतुकोउद्गारांमुळे दोन युवा वर्ल्डकप खेळलेल्या हरमीतच्या कारकीर्दीला संजीवनी मिळाली. चॅपेल यांनी सांगितलेली आणखी एक गोष्ट खरी ठरली. ‘हरमीतसारख्या गोलंदाजाला प्रदीर्घ काळ कनिष्ठ पातळीवर खेळवत राहल्यास ते त्याच्या कारकीर्दीसाठी नुकसानदायी ठरेल.’ चॅपेल यांनी क्रिकइन्फो वेबसाईटसाठी लिहिलेल्या लेखात हे भाकीत केलं होतं. हरमीतचा राष्ट्रीय संघात निवडीसाठी विचार व्हावा असं त्यावेळी चॅपेल यांनी स्तंभात म्हटलं होतं.

२०१३ मधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणाने क्रिकेट कारकिर्दीला ब्रेक

वादात अडकल्याने हरमीतचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न भंगले. २०१३ मधील कुप्रसिद्ध स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये त्याचे नाव विनाकारण ओढले गेले, त्यावेळेस तो राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करत होता. मुंबईतील अंधेरी स्टेशनवर हरमीत गाडी चालवत असतानाच त्याला पोलिसांनी घेरल्याचा हा फोटो व्हायरल झाला. एक प्रतिभावान मुलगा आता भारतीय क्रिकेटचा नकोसा तरुण खेळाडू बनला होता. संघातील सहकारी आणि मित्रही त्याच्यापासून लांब राहू लागले. कार प्रकरणापेक्षा अधिक चर्चा फिक्सिंग प्रकरणाची झाली होती.

“त्या प्रकरणातील माझी बाजू लोकांना कधी ऐकूनच घ्यायची नव्हती, मीडियाने त्यांना जे पटलं, जे आवडलं ते लिहिल. २०१३ मध्ये, माझं नाव त्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात कुठेही नव्हते परंतु कोणीतरी सांगितलं की तो देखील यात सामील आहे आणि लोकांनी त्याची पडताळणी न करता माझ्याबद्दल लिहिलं. या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी स्वतः म्हणाले, ‘मुला तू काही नाही केलंयस, मी बीसीसीआयशी बोलेन. त्यांनी काही केलं तर मला फोन करा.’ इतकं असतानाही मी लोकांची धारणा बदलू शकलो नाही,” असं हरमीत म्हणाला.

“हरमीत निर्दोष आहे यात काहीच शंका नाही,” असं दिल्ली पोलिस आयुक्त (स्पेशल सेल) एसएन श्रीवास्तव यांनी डीएनए या वृत्तपत्राला सांगितले होते. “तो साक्षीदार आहे, माफीचा साक्षीदार नाही.’ त्याच्या निर्दोष असल्याचे आम्ही कोणाही समोर सिध्द करू शकतो. सट्टेबाजांनी त्याच्याशी एकदा संपर्क साधला होता, पण त्याने कधीही त्यांची ऑफर स्वीकारली नाही. हे कोणाही सोबत घडू शकतं.”

एकदा बॉम्बे जिमखाना क्लबमध्ये, त्याला खेळताना पाहत असताना भारताचे कसोटी क्रिकेटपटू दिवंगत दिलीप सरदेसाई अचानक मोठ्याने बोलले, (ये सरदार इंडिया खेलेगा एक दिन.) “हा मुलगा एक दिवस भारतासाठी खेळणार.” पण प्रत्यक्षात मात्र वेगळंच घडलं.

“मला सर्वांनी माझी केलेली स्तुती आठवते, पण मी क्रिकेटमधील राजकारण कसं हाताळालं पाहिजे हे मला कोणीच सांगितले नाही. मी २००९ मध्ये पदार्पण केले आणि एक वेळ अशी आली की मला संधीच मिळत नव्हती. मी याबाबतीत नेमकं काय करावं याचा मार्ग माझ्याकडे नव्हता,” हरमीतने बोलताना सांगितले.

मुंबईच्या क्रिकेट संघात संधी नाही

२००९ ते २०१७ या काळात हरमीतने मुंबईसाठी केवळ नऊ प्रथम श्रेणी सामने खेळले. तो खूप निराश झाला होता. २०१२ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकानंतरही, दुसऱ्या राज्यातील एका प्रसिद्ध प्रशासकाने मुंबईकडून पुन्हा त्याला खेळण्याची संधी मिळणार नाही, असा इशारा दिला होता. तर त्याला संपूर्ण हंगाम खेळायला मिळेल, असे आश्वासन एमसीएच्या पदाधिकाऱ्याने दिले होते. “मी भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळले पाहिजे असे अनेक दिग्गजांनी बोलताना मी ऐकले आहे, मी इराणी ट्रॉफी खेळलो, पण मुंबईने रणजी संघात मला संधीच दिली नाही. मी वर्षभर बेंचवर बसून होतो.” हरमीतने सांगितले.

२०१३ च्या स्पॉट फिंक्सिंग प्रकरणानंतर, पुन्हा मुंबईत परतण्यापूर्वी तो विदर्भ संघात गेला. त्या हंगामात हरमीत चांगला खेळला आणि निवडीसाठी उपलब्ध होता. पण तरीही मुंबईने त्याला खेळण्याची संधी दिली नाही. हंगामाच्या मध्यातच तो जम्मू – काश्मीरला गेला आणि नंतर २०१६ मध्ये पुन्हा मुंबई संघात परतला आणि नंतर २०१७ मध्ये तो पुन्हा मुंबईकडून खेळण्यासाठी आला. पण संधी खूपच कमी मिळाल्या.

हरमीतचे वडील जसबीर आपल्या मुलाला हळू हळू तुटताना पाहत होते. “तो जास्त बोलत नव्हता, तो त्याच्या आईला सांगायचा, ‘मला माहित नाही ते माझ्यासोबत असं का वागत आहेत. मी परफॉर्म करतोय पण तरीही ते माझी निवड करत नाहीत.’ मी त्याला नैराश्यात जाताना पाहत होतो, जे अजिबातच चांगले दृश्य नव्हते. मी त्याला म्हणालो, अरे सोड हे, आपण दुसऱ्या राज्यातून प्रयत्न करू. हळूहळू या सगळ्यातून तो पुढे गेला आणि आता नियतीनेच ठरवले की तो अमेरिकेसाठी खेळेल.”

ह्यूस्टनमध्ये एके रात्री फोन स्पीकरवर ठेवून हरमीत आनंदाने गाडी चालवत होता, कारण त्यादिवशी त्याच्या अमेरिका संघाने बांगलादेशला एका मालिकेत पराभूत केले आणि हरमीतने १३ चेंडूत नाबाद ३३ धावा करत सामना जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जेव्हा त्याने ३३ धावांची खेळी केली, तेव्हा दुसऱ्या दिवशी काही जणांनी त्याला मेसेज करून विचारले की तो हरमीत तूच आहेस का जो भारताच्या अंडर-19 संघाकडून खेळला होता. “मी फक्त हसलो आणि बोललो हो हो तोच हरमीत आहे मी. क्रिकेट तितकेसे लोकप्रिय नव्हते पण आता हळू हळू काळ बदलत आहे, हळूहळू प्रगती होत आहे,” हरमीतने सांगितले.

एका फोन कॉलने बदललं हरमीतचं आयुष्य!

२०२० च्या सुरुवातीस हरमीतला अमेरिकेमधून कॉल आला की त्याला भविष्यात मेजर क्रिकेट लीगमध्ये खेळण्याची इच्छा आहे का? अमेरिका क्रिकेट बोर्ड मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळू शकतील अशा व्यावसायिक क्रिकेटपटूंच्या शोधात होते. सिएटलला जाण्यापूर्वी तो अटलांटामध्ये चार महिने राहिला. क्रिकेट खेळून त्याने अर्धवेळ कोचिंगही केले. २०२१ मध्ये, त्याला अमेरिकेने तीन वर्षांचा करार केला आणि हरमीतने भारतातील खेळाच्या सर्व फॉरमॅटमधू निवृत्ती घेतली. नियमानुसार, जर तो अमेरिकेमध्ये सलग ३० महिने राहिला तर तो अमेरिकेच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्यास पात्र ठरेल आणि मार्च २०२३ पर्यंत तो अमेरिका संघाकडून खेळण्यास पात्र ठरला.

सुरूवातीला अमेरिकेत राहताना हरमीतला अनेक वेगवेगळ्या नोकऱ्या कराव्या लागल्या, याबद्दल त्याच्या वडिलांनी सांगितले, “सुरूवातीला तो अमेरिकेत गेला त्याच्यासाठी तो काळ फार कठीण होता, परंतु त्याने कधीही आमच्याकडे तक्रार केली नाही. त्यांनी त्याला Airbnb मध्ये राहायला दिले आणि काही प्रसंगी त्याने पेट्रोल पंप आणि मॉल्समध्ये काम केले कारण त्याच्याकडे तेव्हा बराचसा वेळ होता. तो तिथल्या एका भारतीय कुटुंबातील मुलांनाही प्रशिक्षण देत असे, जे त्याला खूप आवडायचे.”

हरमीतसाठी संघर्षापेक्षा त्याच्यासाठी क्रिकेट खेळायला मिळणे हे सर्वात महत्त्वाचे होते. २०२२ मध्ये क्लबमधील किंग्समनसाठी मायनर लीगमधील त्याच्या कामगिरीची नोंद घेण्यात आली आणि त्याची राष्ट्रीय संघासाठी निवड झाली.

“मी क्रिकेट कारकिर्दीत एकेक पायरी चढत होतो. अमेरिकेमधील लोक मी ज्याप्रकारे संघर्ष करत याठिकाणी पोहोचलो आहे ते पाहता त्यावरून माझे कौतुक करत होते. मला कोणतेही राजकारण इथे असल्याचे जाणवले नाही. मुंबईत मी पाहिलं की जर त्यांना एखाद्याला संधी द्यायची असेल तर ते मोजक्यांनाच पोटभर संधी देतात आणि जर त्यांना संधी द्यायचीच नसेल तर मग तुम्ही पाच किंवा दहा विकेट घेतल्या तरी ते तुम्हाला संघाबाहेर करतील,” असा अनुभव हरमीतने सांगितला. अमेरिकेत आल्यानंतर जीवन बदललं आहे. हरमीतने सांगितले की तो स्वयंपाक करायला शिकला आहे, त्याच्या सर्वच गोष्टी तो स्वतच्या स्वत करतो.

अमेरिकेच्या वर्ल्डकप संघात हरमीत हा एकटा भारतीय खेळाडू नाही. मुंबईच्या संघातील त्याचे मित्र सौरभ नेत्रावळकर आणि त्रिपुरासाठी क्रिकेट खेळलेला मिलिंद कुमार हेही आहेत. पण त्यांनी स्वेच्छेने ड्रेसिंग रूममध्ये एक नियम बनवला आहे. उपखंडातील अनेक खेळाडू असल्याने मातृभाषेत कोणी बोलणार नाही. “कोणी हिंदी किंवा पंजाबीमध्ये बोलल्यास त्यांना २० डॉलर्सचा दंड ठोठावला जाईल, असे आम्हीच ठरवले. ड्रेसिंग रूमचे वातावरण छान आहे आणि अनेक प्रतिभावान खेळाडूही आहेत, आशा आहे की आमचा वर्ल्डकपमधील प्रवास चांगला असेल,” हरमीत म्हणतो.

रोहित शर्माचा शालेय मित्र

अमेरिकेमध्ये खेळणाऱ्या बहुतांश भारतीय खेळाडूंच्या नजरा १२ जूनला होणाऱ्या सामन्यावर लागल्या आहेत. कारण १२ जूनला विश्वचषक लीग सामन्यात अमेरिकेचा संघ भारताविरूद्ध खेळताना दिसणार आहे. या सामन्यात हरमीत त्याच्या शालेय मित्राविरूद्ध म्हणजेच रोहित शर्माविरूद्ध खेळताना दिसणार आहे. हरमीत आणि रोहित शर्मा बोरिवली येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेत एकत्र शिकले होते. हरमीतला या सामन्यासाठीच्या तिकिटांसाठी अनेक विनंत्या येत होत्या, पण तो किती जणांची ही इच्छा पूर्ण करेल याचा त्यालाही अंदाज नाही, असेही त्याने हरमीतने सांगितले.

हरमीतच्या वडिलांसाठी आपल्या मुलाला वर्ल्डकप खेळताना पाहणे हा अभिमानाचा क्षण असणार आहे. याबद्दल सांगताना ते म्हणाले, “आम्हाला हरमीतला भारताची जर्सीमध्ये पहायचे होते पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते. किमान तो खेळत आहे हे महत्त्वाचे आहे. क्रिकेट त्याचा जीव आहे आणि माझ्या मुलाला त्याच्यासाठी संघर्ष करताना पाहून मला आनंद होत आहे.” हरमीतने आता ह्यूस्टनमध्ये एक छोटासा बंगला भाड्याने घेतला आहे आणि तिथे तो पत्नी आणि दोन मुलांसह राहतो.

अमेरिकेमध्ये उत्कृष्ट क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला वर्षाला सुमारे दोन लाख डॉलर्स कमावण्याची संधी मिळू शकते, जे अनेक क्रिकेटपटूंना आकर्षित करत आहे.

Story img Loader