आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वच संघ वर्ल्डकपच्या तयारीत व्यस्त आहेत. २ जूनपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकात एकूण २० संघ सहभागी झाले आहेत. सर्वांनीच आपले संघ जाहीर केले आहेत. त्यासह आयसीसीच्या या मोठ्या इव्हेंटसाठी प्रत्येक संघाने आपल्या जर्सीचेही अनावरण केले आहे. पण जर्सीच्या बाबतीत युगांडा संघाला थोडे बदल करण्यास सांगण्यात आले. या संघाने आपल्या खेळाडूंसाठी नवीन जर्सीही लाँच केली आहे. पण आयसीसीने या संघाला जर्सीमध्ये बदल करण्यास सांगण्यामागचे नेमके कारण काय आहे, याचा आढावा घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२ जूनपासून आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होत असली तरी त्यासाठीचे सराव सामने सुरू झाले आहेत. तत्पूर्वी युगांडाने विश्वचषकासाठी लाँच केलेल्या जर्सीमध्ये आयसीसीने बदल करण्यास सांगितले. युगांडाच्या जर्सीचा रंग पिवळा असून त्याच्या बाहुंवर पक्ष्यांच्या पिसाची डिझाईन होती, त्यामुळे प्रायोजक लोगो नीट दिसत नव्हता. यावरून आयसीसीने जर्सी बदलण्याचे आदेश युगांडा संघाला दिले. आता संघाने त्याची नवी जर्सी लाँच केली आहे.

हेही वाचा – हार्दिक-नताशाच्या मित्राचे घटस्फोट प्रकरणावर मोठं वक्तव्य, म्हणाला, दोघेही अनेक महिन्यांपासून….

देशाच्या क्रिकेट महासंघाने संघाची जर्सी डिझाईन करण्यासाठी स्पर्धी आयोजित केली होती.या स्पर्धेमधील एका जर्सीची निवड करण्यात आली. देशाचा राष्ट्रीय पक्षी ‘ग्रे क्राउन’ पंखांवरून ही जर्सी एलिजा मांगेनी यांनी डिजाईन केली होती आणि तीच जर्सी निवडण्यातही आली. या जर्सीमध्ये बदल करण्याबाबत आयसीसीने म्हटले आहे की, हातावरील पक्ष्याच्या पिसांचे डिझाईन काढून प्रायोजक लोगो अधिक ठळक केला जावा. हातावर बनवलेले पिसे डिझाईनमध्ये रूपांतरित करावेत, असे आयसीसीने म्हटले आहे. आता युगांडाने बनवलेल्या नव्या जर्सीमध्ये हातावरील पिसे काढण्यात आली आहेत. या नवीन जर्सीमध्ये पँटवर पिसांचे डिझाईन बनवण्यात आले आहे. जुन्या जर्सीच्या तुलनेत २० टक्के बदल करून नवीन जर्सी तयार करण्यात आल्याचे युगांडा क्रिकेट बोर्डाने सांगितले. युगांडाचा संघ वेस्ट इंडिजसाठी रवाना झाल्यानंतर नवीन जर्सचे फोटो शेअर करण्यात आले.

युगांडा संघाच्या जर्सीत अचानक बदल का करण्यात आला यामागचे कारण युगांडामधील क्रिकेटप्रेमींना कळले नाही. त्यामुळे युगांडा क्रिकेट असोसिएशनचे जनसंपर्क अधिकारी मुलासी डेनिस यांनी याचे स्पष्टीकरण दिले. “आयसीसीने संघाला जर्सीच्या डिझाईनमध्ये बदल करण्यास सांगितले होते. पण वेळ कमी असल्याने निवडलेल्या जर्सीच्या डिझाईनमध्ये तडजोड करण्यात आली. मूळ डिझाईनमधील २० टक्के भाग काढून टाकला असून उर्वरित डिझाईन तसंच ठेवण्यात आलं आहे. “

हेही वाचा – T20 World Cup 2024 चे सामने टीव्हीवर लाइव्ह कुठे पाहता येणार? मोबाईलवर तर फ्रीमध्ये मॅच पाहण्याचा लुटता येणार आनंद

T20 World Cup 2024 चे सामने टीव्हीवर लाइव्ह कुठे पाहता येणार? मोबाईलवर तर फ्रीमध्ये मॅच पाहण्याचा लुटता येणार आनंद

युगांडाचा संघ पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकामध्ये खेळणार आहे. ३ जूनपासून संघ आपल्या टी-२० विश्वचषक मोहिमेला अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्याने सुरूवात करणार आहे. युगांडा संघाचा पहिला सामना गयाना येथे होणार आहे.

टी-२० विश्वचषकासाठी युगांडाचा संघ
ब्रायन मसाबाटीम (कर्णधार), सायमन सेसाजी, रोजर मुकासा, कॉस्मास क्युवुटा, दिनेश नकरानी, फ्रेड अचेलम, केनेथ वॅस्वा, अल्पेश रामजानी, फ्रँक नसुबुगा, हेन्री सेन्सियोन्डो, बिलाल हसुन, रॉबिन्सन ओबुया, रियाजत अली शाह (उपकर्णधार), जुमा मियाजी, रौनक पटेल. राखीव खेळाडू: मासूम मवेबेज, रोनाल्ड लुटाया.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2024 icc ask uganda team to change their jersey of feathered pattern what is the reason bdg
Show comments