IND vs PAK Updates: भारतीय संघाने ट्वेन्टी २० वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानवर ६ धावांनी शानदार विजय मिळवला. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री ८ वाजता सुरू झालेला हा सामना मध्यरात्री संपला. ऋषभ पंतने साकारलेली ४२ धावांची खेळी, तीन भन्नाट झेल आणि जसप्रीत बुमराहने शिस्तबद्ध माऱ्यासह पटकावलेल्या ३ विकेट्स या विजयाचं वैशिष्ट्य ठरल्या. भारतीय संघाने विजयासाठी १२० धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, भारतीय संघाने शानदार बॉलिंग करत पाकिस्तानला २० ओव्हरमध्ये ११३ धावांवर रोखलं. त्यामुळे भारताने पाकिस्तानवर चित्तथरारक असा विजय मिळवला.

न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पार पडला. भारतीय संघाने दिलेल्या १२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान विजयाच्या जवळ आला होता. मात्र, भारतीय संघांच्या फलंदाजांनी केलेल्या खेळीमुळे पाकिस्तानचा पराभव झाला. पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार बाबर आझमने यावर प्रतिक्रिया देत या पराभवाचे कारण सांगितलं आहे. जास्त डॉट बॉल खेळल्यामुळे पराभव झाल्याचं कारण कर्णधार बाबर आझमने सांगितलं आहे.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
India Alliance News
INDIA Alliance : इंडिया आघाडी महाराष्ट्रातील निकालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, भाजपाने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप कायम
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Rohit Sharma Statement on Mohammed Siraj and Travis Head Fight in IND vs AUS 2nd Test
IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य
Rohit Sharma Statement on India Defeat in Pink Ball Test Said we didnt play well enough to win the game
IND vs AUS: भारताने पिंक बॉल कसोटी गमावण्यामागचं रोहित शर्माने सांगितलं कारण, कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर?
Sharad Pawar News
Chandrashekhar Bawankule : “शरद पवारांनी या वयात खोटारडेपणा करु नये, पराभव स्वीकारावा आणि..”, भाजपाच्या ‘या’ नेत्याची टीका

हेही वाचा : IND vs PAK: ऋषभने रचला पाया, बुमराहने रचला कळस; भारताचा पाकिस्तानवर चित्तथरारक विजय

कर्णधार बाबर आझम म्हणाला, “आम्ही चांगली गोलंदाजी केली. पण फलंदाजी करत असताना आम्ही विकेट गमावल्या. त्यात अनेक डॉट बॉल खळलो. त्यामुळे आम्हाला विजयापर्यंत पोहतचा आले नाही. आम्ही सामान्यपणे खेळण्यासाठी डावपेच सोपे होते. स्ट्राइक रोटेशन आणि चौकार मारण्याची योजना होती. पण याचवेळी खूप डॉट बॉल्स खळलो, त्यामुळे विजयापर्यंत जाता आलं नाही. तसेच विकेट गेल्यामुळे चांगली कामगिरी करता आली नाही. यामध्ये शेवटच्या फलंदाजाकडून जास्त अपेक्षा ठेवता येत नाहीत”, अशी प्रतिक्रिया बाबर आझमने दिली.

पाकिस्तानची सुरूवात चांगली, पण…

पाकिस्तानची सुरूवात लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली झाली. मात्र, भारताच्या गोलंदाजीसमोर खेळाडू मोठी धावसंख्या करू शकले नाहीत. भारताच्या गोलंदाजीसमोर खेळाडू मोठी धावसंख्या करू शकले नाहीत. बाबर आझम, उस्मान खान, फखर जमान हे तिन्ही फलंदाज प्रत्येकी १३ धावा करत बाद झाले. तर इमाद वसीम १५ धावा करून बाद झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिजवानने ४४ चेंडूत १ चौकार आणि एका षटकारासह ३१ धावा केल्या, पण तोही १५ व्या षटकात बुमराहकडून क्लीन बोल्ड झाला. याशिवाय पाकिस्तानचे इतर खेळाडू स्वस्तात बाद झाले. पाकिस्तानचा संघ १५ षटकांनंतर एकही चौकार षटकार लगावू शकला नाही. अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर एक चौकार लागला पण तोपर्यंत सामना हातातून निघून गेला होता.

Story img Loader