T20 World Cup 2024 Live Streaming: बहुप्रतिक्षित टी-२० विश्वचषक २०२४ सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या विश्वचषकासाठी सर्वच देशांचे संघ अमेरिकेत दाखल होत आहेत. टी-२० विश्वचषक १ जूनपासून सुरू होणार असला तरी भारतीय वेळेनुसार सामने २ जूनपासून सुरू होणार आहेत. कारण यंदाचा टी-२० विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जाणार आहे. भारतातील आणि तिथल्या वेळांमध्ये खूप फरक आहे. यासह वर्ल्डकपचे सामने लाइव्ह कुठे पाहता येतील हे जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टी-१० विश्वचषक सुरू होण्यापूर्वी सराव सामने खेळवले जात आहेत. जिथे संघ त्यांच्या तयारीला अंतिम स्वरूप देतील. दरम्यान, आता टी-२० वर्ल्डकपचे सामने टीव्ही आणि मोबाईलवर लाइव्ह कसे पाहता येणार, याचा आढावा घेऊया. नुकत्याच संपलेल्या आयपीएलचे लाइव्ह स्ट्रीमिंग आपण स्टार स्पोर्ट्सवर पाहत होतो, त्याप्रमाणेच टी-२० वर्ल्डकपचे सामनेही टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहेत. तर मोबाईलवर वर्ल्डकप सामन्यांच लाइव्ह प्रक्षेपण हे डीज्नी प्लस हॉटस्टार या अॅपवर पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा – IPL 2024: ५५ लाख रुपयांच्या मानधनावरुन रिंकू सिंग म्हणाला

१५ मे रोजी डिस्ने हॉट स्टारने जाहीर केले की वर्ल्डकपचे सर्व सामने पूर्णपणे विनामूल्य पाहण्यासाठी उपलब्ध असतील. म्हणजेच यासाठी अधिक पैसे द्यावे लागणार नाहीत. म्हणजेच मोबाईलवर सामना पाहण्यासाठी तुम्हाला फक्त डिस्ने प्लस हॉट स्टार ॲप डाउनलोड करावे लागेल, इतर कोणतंही सबस्क्रिप्शन घेण्याची गरज भासणार नाही. जर तुम्ही स्मार्ट टीव्ही चालवत असाल तर हे ॲप आधीच डाउनलोड केलेले आहे. त्यामुळे तुमच्या टीव्हीवर डिस्ने प्लस हॉट स्टारवर सामना थेट पाहू शकता. त्यामुळे आता वर्ल्डकपचे सामने मोबाईलवर पाहण्यासाठी जिओ सिनेमा नव्हे तर डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपकडे वळावे लागणार आहे.

हेही वाचा – हार्दिक-नताशाच्या घटस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, भाऊ कृणालच्या पोस्टवरील पंड्याच्या बायकोची कमेंट व्हायरल

वर्ल्डकपमधील काही सामने हे भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजल्यापासून सुरू होतील, तर काही सामने संध्याकाळी ८ वाजल्यापासून सुरू होतील. पण चांगली गोष्ट म्हणजे भारताचे सर्व सामने संध्याकाळीच होतील. यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये एकूण २० संघ खेळणार आहे. ४ गटांमध्ये या ५ संघांचे विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक गटातून दोन-दोन संघ पुढे येतील. या संघांमध्ये सुपर-८ सामने खेळवले जातील. १९ जूनपासून सुपर ८ चे सामने सुरू होतील. सुपर ८ मधून ४ संघ सेमीफायनल खेळतील आणि यातील दोन विजयी संघ २९ जून रोजी अंतिम सामना खेळणार आहेत.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2024 live streaming free on disney plus hotstar mobile app and star sports on tv read details bdg
Show comments