Nambia vs Oman T20 World Cup Match Highlights: नामिबियाने टी-२० वर्ल्डकपच्या संघाच्या पहिल्याच सुपर ओव्हर सामन्यात विजयी सलामी दिली. थरारक सुपर ओव्हरमध्ये नामिबियाने ओमानचा पराभव केला. टी-२० विश्वचषकातील ओमान वि नामिबियाच्या तिसऱ्या सामन्यातच सुपर ओव्हर पाहायला मिळाली आहे. नामिबियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करताना नामिबियाने ओमानला १९.४ षटकांत १०९ धावांमध्ये ऑल आऊट केले. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ओमानचा संघ २० षटकांत १०९ धावा करू शकला. त्यामुळे सामना बरोबरीत राहिला आणि सुपर ओव्हर पाहायला मिळाला. सुपर ओव्हर सामन्यातही नामिबियाची फलंदाजी जबरदस्त राहिली.
नामिबियाचा संघ १०९ धावांचा पाठलाग सहज करेल असे एकेकाळी वाटत होते. नामिबियाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या खऱ्या पण लक्ष्य सहज गाठण्याजोगे होते. अखेरच्या षटकात नामिबियाला विजयासाठी ५ धावांची गरज होती. ओमानकडून गोलंदाज मेहर खानने भेदक गोलंदाजी करत धावांना ब्रेक लावला. त्याने पहिल्या तीन चेंडूत दोन विकेट घेत सामना रोमांचक केला. नामिबियाला शेवटच्या चेंडूवर दोन धावा करायच्या होत्या आणि सामना एका धावेवर टाय झाला. एक धाव घेतानाच धावबाद करत सामना जिंकण्याची मोठी संधी ओमानकडे होती, पण यष्टीरक्षकाचा अंदाज चुकल्याने चेंडू बाजूने गेला आणि सामना टाय झाला.
नामिबियाने सुपर ओव्हरमध्ये अनुभवी फलंदाज डेव्हिड व्हिसा आणि इरॅस्मस ही जोडी फलंदाजीला आली. तर ओमानकडून अनुभवी गोलंदाज बिलाल खानकडे गोलंदाजी सोपवण्यात आली. पण डेव्हिड व्हिसाची फटकेबाजी बिलालच्या गोलंदाजीवर चांगलीच भारी पडली. नामिबियाकडून या दोन्ही फलंदाजांनी २१ धावा केल्या. व्हिसाने पहिल्याच दोन चेंडूवर चौकार आणि षटकार लगावत फटकेबाजी सुरू केली. तर अखेरच्या दोन चेंडूंवर इरॅस्मसने चौकार लगावत २१ धावांची मोठी धावसंख्या उभारली.
Delivering in all facets of the game ?
— ICC (@ICC) June 3, 2024
The Namibia talisman, David Wiese, takes home the @aramco POTM after his heroic effort led his side to victory over Oman ?️#T20WorldCup #NAMvOMA pic.twitter.com/0mbPjRLaa8
सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना २२ धावांचा पाठलाग करताना ओमानची सुरूवात खराब झाली. पुन्हा एकदा नामिबियाकडून अनुभवी खेळाडू वीजा गोलंदाजीसाठी आला. भेदक गोलंदाजी करत नामिबियाला पहिल्या तीन चेंडूतच विजय निश्चित केला. व्हिसाच्या तिसऱ्या चेंडूवर नसीम खुशी क्लीन बोल्ड झाला. पुढच्या दोन चेंडूवर व्हिसाने एक-एक धाव दिली. तर अखेरच्या चेंडूवर ओमानकडून अकिबने षटकार लगावला खरा पण तोपर्यंत नामिबियाने विजय आपल्या बाजूने केला होता.
सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना २२ धावांचा पाठलाग करताना ओमानची सुरूवात खराब झाली. पुन्हा एकदा नामिबियाकडून अनुभवी खेळाडू वीजा गोलंदाजीसाठी आला. भेदक गोलंदाजी करत नामिबियाला पहिल्या तीन चेंडूतच विजय निश्चित केला. व्हिसाच्या तिसऱ्या चेंडूवर नसीम खुशी क्लीन बोल्ड झाला. पुढच्या दोन चेंडूवर व्हिसाने एक-एक धाव दिली. तर अखेरच्या चेंडूवर ओमानकडून अकिबने षटकार लगावला खरा पण तोपर्यंत नामिबियाने विजय आपल्या बाजूने केला होता.
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील चौथी तर या स्पर्धेतील फक्त तिसरी सुपर ओव्हर पाहायला मिळाली. २००७ वर्ल्डकप मध्ये भारत वि पाकिस्तान यांच्यात सामना टाय झाल्यानंतर बोल्ड आऊटवरून विजेता ठरला होता. पहिली सुपर ओव्हर २०१२ मध्ये खेळवली गेली होती, जेव्हा कँडीमध्ये झालेल्या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंड संघाचा पराभव केला होता. तर २०१२ मध्येच वेस्ट इंडिजने न्यूझीलंड संघाचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला होता.
टी-२० विश्वचषकातील सुपर ओव्हर्स
१. न्यूझीलंड – ७ बाद १७४/7, श्रीलंका ६ बाद १७४ – श्रीलंकेने सुपर ओव्हर जिंकली, १ बाद १३ – १ बाद ७ – कँडी, २०१२
- वेस्ट इंडिज १३९ (१९.३ षटके) – न्यूझीलंड ७ बाद १३९ (२० षटके) – वेस्ट इंडिजने सुपर ओव्हर जिंकली, १९/० – १७/० – कँडी, २०१२
- ओमान १०९ (१९.४ षटके) – नामिबिया ७ बाद १०९ (२० षटके) – नामिबियाने सुपर ओव्हर जिंकली, २१/० – १ बाद १० – बार्बाडोस, २०२४