T20 World Cup 2024: येत्या २ जूनपासून बहुचर्चित अशा टी-२० विश्वचषक २०२४ चे सामने खेळवले जाणार आहेत. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या यजमानपदाखाली ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यंदाच्या विश्वचषकात तब्बल २० संघ पहिल्यांदाच खेळणार आहेत. जागतिक स्तरावर क्रिकेट खेळणाऱ्या मोठ्या देशांसोबतच इतरही देशांनी पात्रता फेरीत चमकदार कामगिरी करत यंदाचा टी-२० वर्ल्डकप खेळणार आहेत. अनेक देश पहिल्यांदाच विश्वचषकासाठी पात्र झाले आहेत.

सर्वच देशांनी वर्ल्डकपसाठी संघ जाहीर केला आहे. या २० देशांपैकी ३ देश पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणार आहेत. ज्यात अमेरिका, कॅनडा आणि युगांडाम हे संघ पहिल्यांदाच खेळणार आहेत. २०२४च्या विश्वचषकासाठी २० संघांना चार गटात विभागले आहे. प्रत्येक गटात ५ संघ आहेत. या ५ पैकी केवळ २ संघ सुपर ८ साठी पात्र ठरतील. या २० देशांमध्ये पापुआ न्यु गिनी नावाचाही एक देश आहे. ज्याबद्दल फार कमी लोकांनी ऐकलं आहे. हा देशही यंदा टी-२० विश्वचषक खेळणार आहे.

हेही वाचा – न्यूयॉर्कमध्ये ‘ढगाला लागली कळ…’ भर पावसात रोहित-द्रविडची पळापळ, VIDEO व्हायरल

टी-२० वर्ल्डकप खेळणारे हे खेळाडू आहेत तरी कोणत्या संघाचे?

पापुआ न्यू गिनी संघ: असद्दोला वाला (कर्णधार), सीजे अमिनी (उपकर्णधार), एली नाओ, चाड सोपर, हिला वेरे, हिरी हिरी, जॅक गार्डनर, जॉन कारिको, काबुआ वागी मोरिया, किपलिंग डोरिगा, लेगा सियाका, नॉर्मन वानुआ, सेमा कामिया, सेसे बाऊ, टोनी उरा.

असद वाला टी-२० विश्वचषक स्पर्धेत १५ सदस्यीय पापुआ न्यू गिनी संघाचे नेतृत्व करेल. तर लेगस्पिनिंग अष्टपैलू सीजे अमिनी उपकर्णधार असेल. पापुआ न्यू गिनी संघ हा आयसीसी पुरुषांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील दुसऱ्यांदा सहभागी होणार आहे. २०२१ च्या मोहिमेसाठी असद वाला १० खेळाडूंपैकी एक आहे, तर २०२१मध्ये राखीव खेळाडू असलेल्या जॅक गार्डनरची यावेळी १५ खेळाडूंच्या संघात निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा – गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा प्रक्षिक्षक होण्याच्या चर्चेदरम्यान गांगुलीने BCCI चे कान टोचले; म्हणाला, “थोडं समजुतदारपणे…”

काबुआ मोरिया आणि नॉर्मन वानुआ हे दोन खेळाडू आहेत ज्यांनी पापुआसाठी हॅटट्रिक घेतली आहे. काबुआ मोरियाने फिलिपाइन्सविरुद्ध हॅटट्रिक घेतली आणि नॉर्मन वानुआने बर्म्युडा संघाविरुद्ध हॅटट्रिक घेतली. हे दोन्ही खेळाडू यावेळी पापुआ न्यू गिनीच्या विश्वचषक संघाचा भाग आहेत.

कर्णधार असद वाला म्हणाला, “संघातील खेळाडू उत्साही आणि ऊर्जेने परिपूर्ण आहेत. गेल्या टी-२० विश्वचषकात खेळलेल्या खेळाडूंसाठी खूप सराव करून प्रशिक्षण घेत या स्पर्धेत उतरणे ही एक वेगळीच भावना आहे, कारण गेल्या वेळी कोविडमुळे तितकीशी तयारी झाली नव्हती. मी या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहे कारण मला माहित आहे की आम्ही चांगली कामगिरी करणार आहोत.”

हेही वाचा – T20 WC 2024: हरमीत सिंह; रोहित शर्माचा मित्र, फिक्सिंगचा आरोप आणि ढवळून निघालेली कारकीर्द

पापुआ न्यू गिनी २ जूनपासून यजमान वेस्ट इंडिजविरूद्धच्या लढतीने आपल्या मोहिमेला सुरूवात करणार आहे आणि त्यानंतर ५ जून रोजी युगांडा विरुद्ध लढत होईल. १३ जून रोजी त्यांचा सामना अफगाणिस्तानशी होईल.