T20 World Cup 2024 USA Cricket Team: टी-२० विश्वचषक २०२४ साठी अमेरिकेचा संघही पात्र ठरला आहे. अमेरिकेचा संघ प्रथमच टी-२० विश्वचषकात खेळणार असून हा विश्वचषकही त्यांच्या घरच्या मैदानावर होत आहे. अमेरिकेच्या या वर्ल्डकप संघात अनेक भारतीय खेळाडू आहेत जसे की हरमीत सिंग, मिलिंद कुमार पण यांच्यापैकी एक मराठमोळा खेळाडूही आहे. जो पेशाने इंजीनियर आहे. तो म्हणजे सौरभ नेत्रावळकर. सौरभ नेत्रावळकरचा क्रिकेट कारकिर्दितील प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत.

क्रिकेटपटू आणि इंजिनीयर या दोन्ही भूमिका लिलया पार पाडत आता मराठमोठा सौरभ नेत्रावळकर हा अमेरिकेच्या राष्ट्रीय संघाकडून वर्ल्डकप खेळताना दिसणार आहे. सौरभ नेत्रावळकर हा मुळचा मुंबईचा असून तो पेशाने इंजीनियर आहे. सौरभ हा भारताच्या २०१० मध्ये झालेल्या १९ वर्षाखालील वर्ल्डकप संघाचा भाग होता, ज्यामध्ये तो केएल राहुल, हर्षल पटेलसारख्या खेळाडूंसह खेळला आहे. यानंतर मुंबईकडून रणजी ट्रॉफीही तो खेळला आहे. पण सौरभ आता अमेरिकेकडून क्रिकेट खेळतो. शिकण्यासाठी अमेरिकेत गेलेला सौरभ पुन्हा क्रिकेटकडे कसा वळला, जाणून घ्या.

Tim Southee Retirement From Test Cricket After 3 match Home Series Against England Said its tough decision but it is the right one
रोहित-सेहवागपेक्षा सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या गोलंदाजाने जाहीर केली निवृत्ती, ‘हा’ कसोटी सामना अखेरचा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Sanju Samson reach 39th position in ICC T20I rankings
Sanju Samson : संजू सॅमसनची आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप! सलग दोन सामन्यात शतक झळकावत पटकावले ‘हे’ स्थान
IPL 2025 Mega Auction Most Expensive Foreigner Player
IPL 2025 : जोस बटलर किंवा मिचेल स्टार्क नव्हे तर… दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ युवा अष्टपैलू ठरु शकतो सर्वात महागडा परदेशी खेळाडू
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?

हेही वाचा – T20 WC 2024: हरमीत सिंह; रोहित शर्माचा मित्र, फिक्सिंगचा आरोप आणि ढवळून निघालेली कारकीर्द

आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरूवातीच्या काळात क्रिकेट आणि शिक्षण यातील एकाची निवड करताना सौरभने आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करायचे ठरवले, पण हा कठोर निर्णय त्याने कसा घेतला आणि त्याची आवड असलेलं क्रिकेट इच्छाशक्तीमुळे परत कसं आलं, हा भाग आहे मोठा महत्त्वाचा आहे. मुंबईतील या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने भारताकडून क्रिकेट खेळण्याचे स्वप्न मागे ठेवून अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला. केएल राहुल, मयंक अग्रवालसारख्या क्रिकेटपटूंसोबत अंडर-१९ वर्ल्डकप खेळलेल्या सौरभने कॉर्नवल विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स करण्यासाठी हा खेळ सोडण्याचा कठोर निर्णय घेतला.

मालाडमध्ये राहणारा सौरभ लहानपणी गल्ली क्रिकेट खेळत असे. सौरभचे बाबा हे टेनिस क्रिकेट प्रचंड खेळायचे. त्यामुळे क्रिकेटचे अगदी सर्व सामने घरी बघितले जायचे, बिल्डिंगमध्ये सुरूवातीला सौरभ रबर बॉलने क्रिकेट खेळायचा. वडिलांसोबत आणि बिल्डिंगमधल्या मित्रांसोबतच सौरभने क्रिकेटचे धडे गिरवले. सौरभ १० वर्षांचा असताना त्याचे बाबा त्याला चर्चगेटमधील ओव्हल मैदानावर वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या निवडीसाठी घेऊन गेले होते आणि तिथून त्याच्या व्यावसायिक क्रिकेटला सुरूवात झाली. या निवडीत वेगवान गोलंदाज म्हणून सौरभची निवड झाली. यानंतर चांगली कामगिरी करत पुढे अंडर-१३ पासून ते अंडर-१९ पर्यंत सौरभने मजल मारली.

हेही वाचा – न्यूयॉर्कमध्ये ‘ढगाला लागली कळ…’ भर पावसात रोहित-द्रविडची पळापळ, VIDEO व्हायरल

२००९ मध्ये कॉर्पोरेट ट्रॉफीचे सामने खेळवण्यात आले होते. या स्पर्धेचा सौरभला फार फायदा झाला. त्या ट्रॉफीच्या वेळेस सौरभ एनसीएच्या कॅम्पसाठी बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होता. त्यावेळेस एअर इंडियाचा संघ कॉर्पोरेट ट्रॉफीसाठी तिथे होता आणि त्यांच्या गटात स्कॉलरशिप खेळाडू म्हणून सौरभ सराव करत असे. त्यालाही अंदाज नव्हता तो कॉर्पाेरेट ट्रॉफी खेळणार आहे. त्यावेळेस एअर इंडिया संघाचा युवराज सिंग कर्णधार होता तर सुरेश रैना, रॉबिन उथप्पा असे भारताचे दिग्गज खेळाडू संघाचा भाग होते. भारताच्या या स्टार खेळाडूंना पाहणं आणि त्यांच्यासोबत सराव करण्याची संधी मिळाल्याने सौरभने मुलाखतीत देवाचे आभारही मानले. त्या सरावात सौरभच्या गोलंदाजीवर सर्वच प्रभावित झाले आणि त्यांनी संघात खेळण्याची संधी सौरभला दिली. धवल कुलकर्णीने सौरभला त्या टूर्नामेंटमध्ये गोलंदाजीसाठी खूप मदत केली होती. विराट कोहली आणि एम एस धोनी सारख्या खेळाडूंच्या विरूद्ध तो सेमी फायनल, फायनलमध्ये खेळला आहे.

या टूर्नामेंटमुळे त्याची गोलंदाजी अधिक चांगली झाली आणि त्यामुळे अंडर-१९ च्या संघात त्याची निवड होण्यात मदत झाली. २०१० च्या अंडर-१९ संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित होते. या वर्ल्डकपूर्वी भारताच्या अंडर-१९ संघासोबत सौरभ तिरंगी मालिकेसाठी पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेला गेला होता. या मालिकेत श्रीलंकेविरूद्ध घेतलेल्या ५ विकेट्ससह त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. या वर्ल्डकपमध्ये देशासाठी खेळण्याची लहानपणापासूनची इच्छा पूर्ण झाली होती. तो अंडर-१९ वर्ल्डकप जिंकू न शकल्याची सल सर्वांच्या मनात होती. पण प्रत्येकाने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला होता.

शाळेपासूनच क्रिकेटसह सौरभला अभ्यासाची आवड होती. सरावानंतर येऊन शाळेचा अभ्यास तो करायचा त्यामुळे ती सवय त्याला लागली होती. पण दहावी झाल्यानंतर त्याने सायन्स निवडलं होतं आणि विज्ञानाचा अभ्यास करत क्रिकेट खेळताना अडचणी यायचा. २०१० चा अंडर-१९ वर्ल्डकपच्या वेळेस सौरभचं सायन्सचं पहिलं वर्ष होतं, जे सौरभसाठी खूप कठीणं होतं. पहिल्या सेमिस्टरच्या परिक्षेला सौरभ वर्ल्डकपसाठी गेल्याने त्याला ४ विषयात केटी होत्या, कारण तो परिक्षेसाठी जाऊच शकला नव्हता. पण त्याने पुढच्या सेमिस्टरमध्ये एकदम १० पेपर दिले होते. जे त्याच्यासाठी थोड कठीण होतं पण सरदार पटेल कॉलेजच्या शिक्षकांनीही त्याला सपोर्ट केला होता.

क्रिकेट सोडून पुढील शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय सौरभने का घेतला?

क्रिकेट खेळता खेळता २०१३ मध्ये सौरभने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. तेव्हा त्याला पुण्यामध्ये नोकरी मिळाली होती, क्रिकेट सोडून तो नोकरीसाठी पुण्याला जाणार होता. पण तेव्हा क्रिकेट सोडायला तो तयार नसल्याचं त्याला जाणवलं आणि त्याने ही संधी नाकारली. मग पुढील दोन वर्ष क्रिकेटला द्यायची असं त्याने ठरवलं. त्याने खूप मेहनत घेऊन सराव केला आणि घरच्यांनीही त्याला पाठिंबा दिला. परिणामी २०१३ मध्येच सौरभने मुंबईकडून रणजीसाठी पदार्पण केले. दोन वर्षे तो मुंबईसाठी खेळला पण सातत्याने संघाकडून खेळण्याची संधी त्याला मिळत नव्हती. आयपीएलमध्येही संधी मिळत नव्हती मग त्याने पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

२०१३ मध्ये त्याने दोन वर्ष पूर्णपणे क्रिकेटसाठी देण्याचा निर्धार केला होता. जर मी भारतासाठी क्रिकेट खेळू शकत नाही आणि मला जर तिथेपर्यंत पोहोचायचा मार्ग नाही दिसत तर मग इंजिनीयरींगमध्येही तितकीच आवड असल्याने त्याने हा मोठा निर्णय घेतला. त्यावेळी अभिषेक नायर सारख्या इतर सिनीयर खेळाडूंशीही या विषयावर त्याने चर्चा केली होती. २०१५ मध्ये क्रिकेट सोडण्यापूर्वी तो विजय हजारे ट्रॉफी खेळला पण रणजीसाठी त्याची निवड न झाल्याने मग त्याने ठरवले क्लब क्रिकेट खेळण्यावाचून आता त्याच्याकडे इतर पर्याय नव्हता. संघात निवडीसाठी स्पर्धाही खूप होती आणि पुन्हा संधी मिळेल याची खात्रीही नव्हती. मग त्याने अमेरिकेला शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सौरभसाठी खूप अवघड होता कारण लहानपणापासून त्याने भारतासाठी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पाहिलं होतं. अंडर-१९ वर्ल्डकप खेळून हे स्वप्न थोडंसं पूर्ण झालं होतं. पण त्यावेळी हा निर्णय घेणं महत्त्वाचही होतं. पण आता सौरभ त्याच्या या निर्णयावर खूश असल्याचे त्याने स्पोर्ट्स कट्टाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

हेही वाचा – T20 WC 2024: हिरी हिरी, चाड सोपर, असद्दोला वाला – ट्वेन्टी२० वर्ल्डकप खेळणारी कोण ही मंडळी?

अमेरिकेत गेल्यावर पुन्हा क्रिकेटला सुरूवात कशी झाली?

अमेरिकेत कॉलेजमध्ये क्रिकेट हे विरंगुळा म्हणून असायचं, त्या टुर्नामेंटमध्ये तो खेळायचा. पण त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला सॅन फ्रान्सिस्कोमधील ओरॅकलमध्ये नोकरी मिळाली. तेव्हा त्याचे भारतातील प्रशिक्षक संग्राम सावंत यांनी त्याला अमेरिकेत क्लब क्रिकेट खेळण्यासाठी संपर्क करण्यासाठी नंबर दिला होता. तिथून त्याने क्लब क्रिकेट खेळायला सुरूवात केली, त्या क्लबमध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय संघाकडून खेळणारे ३-४ खेळाडू होते. त्या खेळाडूंनी त्याला अमेरिकेतील क्लब क्रिकेटची पध्दत समजावून सांगितली. अमेरिकेमध्ये लाँग वीकेंड असतो म्हणजे सुट्टी शुक्रवारी किंवा सोमवारी असते. तर हे ४ दिवस टी-२० च्या मोठ्या टूर्नामेंट असतात. तेथील फ्रँचायझी संघ तयार करतात आणि त्या स्पर्धेत नाव नोंदणी केली जाते. अशा टूर्नामेंट सौरभने खेळायला सुरूवात केली, त्याच्या फिटनेसवर तो लक्ष देऊ लागला.

अमेरिकेच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी एक नियम आहे की ७ वर्ष तिथे राहणं महत्त्वाचं आहे. पण राष्ट्रीय संघाकडून खेळण्याचा सुरूवातीला त्याचा काही विचार नव्हता. नोकरी करून वीकेंडला टूर्नामेंट खेळणं हे सौरभचं ठरलेलं रूटीन असायचं. पुढे तीन वर्षे ह्या टूर्नामेंट सौरभ सातत्याने खेळत होता आणि तेव्हाच आयसीसीने नियम बदलला की राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी ७ ऐवजी आता ३ वर्षे अमेरिकेत राहणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा देवाची कृपा झाली असं झालं. त्याच्या गोलंदाजीवर राष्ट्रीय संघातील प्रशिक्षकही खूश झाले आणि सोबतच त्याला संघातही संधी मिळाली.

अमेरिकेत सौरभ फक्त शिक्षणासाठी गेला होता त्यामुळे त्याची किट बॅग त्याचे स्पाईकचे शुजही तो भारताताच ठेवून गेला होता. पुन्हा तो कधी व्यावसायिक क्रिकेट खेळेल असं त्याला कधीचं वाटलं नव्हतं. पण त्याच्यामधील क्रिकेटपटूमुळे त्याला ही संधी पुन्हा मिळाली.

हेही वाचा – गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा प्रक्षिक्षक होण्याच्या चर्चेदरम्यान गांगुलीने BCCI चे कान टोचले; म्हणाला, “थोडं समजुतदारपणे…”

अमेरिकेमधील सौरभचं रूटीन

अमेरिकेमध्ये स्पोर्ट्स कोटा वगैरे नसतो. अजूनही सौरभ ओरॅकलमध्ये सॉफ्टवेअर इंजीनियर म्हणून काम करतो, असे त्याने मुलाखतीत सांगितले. २०१६ मध्ये त्याने इंजिनीयर म्हणून कामाला सुरूवात केली. सुरूवातीची ३ वर्ष इतकं क्रिकेट सौरभ खेळत नसे कारण तो सोमवार ते शुक्रवार पूर्ण वेळ काम करत असे. ९ ते ५ नोकरी केल्यानंतर ७ ते ९ इनडोअर सराव करायचा अन् सकाळी किंवा ऑफिसनंतर फिटनेससाठी जिमला जात असे. त्यानंतर मग वीकेंडला सामने खेळण्यासाठी जाणं असं त्याचं रूटीन असायचं. सौरभ अजूनही ओरॅकलमध्ये कार्यरत आहे. इतकी वर्षे काम केल्यानंतर कंपनीही त्याला सपोर्ट करते आणि अर्थातच सौरभच्या चोख कामही वेळोवेळी दिसून येतं. जेव्हा तो सामन्यांसाठी दौऱ्यावर असतो आणि ऑफिसच्या काही मिटिंग असल्या की तो जास्तीचं कामही करतो. फिटनेससाठी सौरभ गेले १-२ वर्षे सातत्याने योगा करतो. तर प्लॅन्ट बेस्ड डाएटही तो फॉलो करतो.

भारताविरूद्धच्या सामन्यात खेळताना एक भावुक करणारा क्षण असणार आहे, कारण त्यातल्या बऱ्याचशा खेळाडूंसोबत तो लहानपणापासून खेळला आहे. त्यांना भेटण्याची, त्यांच्यासोबत सराव करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे हा सामनाही तितकाच महत्त्वाचा असेल, असे सौरभने मुलाखतीत सांगितले.

हेही वाचा – T20 WC 2024: “मी संघाचा कर्णधार आहे…”, रोहित शर्मा सर्वांसमोर कुलदीपला पाहा काय म्हणाला; VIDEO व्हायरल

अमेरिकेतील लीग

भारतामध्ये ज्याप्रकारे आयपीएलचे सामने खेळवले जातात, त्याप्रमाणेच अमेरिकेत गेल्या २-३ वर्षांमध्ये मेजर क्रिकेट लीग आणि मायनर क्रिकेट लीग खेळवली जाते. जिथे अनेक देशातील खेळाडू खेळण्यासाठी सहभाग घेतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचा संघ प्रथमच हा वर्ल्डकप खेळणाऱ आहे आणि यामागे या क्रिकेट लीगचा ही मोठा वाटा आहे. एका सामन्यात सौरभने मार्कौ यान्सन आणि नॉर्कियासारख्या खेळाडूंसोबत खेळताना चमकदार कामगिरी केली होती. ज्याचा किस्सा त्याने स्पोर्ट्स कट्टाला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. या दोन दिग्गज गोलंदाजांसमोर सौरभ हा तसा साधारण गोलंदाज असल्याचे फलंदाजांना वाटेल आणि ते मोठे फटके खेळतील याची जाणीव सौरभला होती. पण त्या दिवशी सामना खेळताना त्याला चांगला स्विंग मिळाला आणि त्याने चमकदार कामगिरी केली, ज्याच्यासाठी त्याने देवाचे आभार मानले.

सौरभ नेत्रावळकर मेजर क्रिकेट लीगमध्ये वॉशिंग्टन फ्रिडम संघाकडून खेळतो. त्या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक डेल स्टेन होते. स्वत: एक वेगवान गोलंदाज असल्यान सौरभ लहानपणापासून स्टेनचा मोठा चाहता आहे आणि स्टेनसोबत सराव करणं त्याच्याकडून शिकणं हा सौरभच्या जीवनातील एक चांगला आणि मोठा क्षण होता. सौरभ आता अमेरिकेच्या वर्लडकप संघात खेळताना दिसणार आहे.