T20 World Cup 2024 Matches at Nassau Cricket stadium: न्यू यॉर्कच्या नासाऊ काउंटी स्टेडियमवर पहिल्या टी-२० विश्वचषकाच्या सामन्यापूर्वी सुरक्षा कडक करण्यात आली असून, मैदानाभोवती अनेक ठिकाणी पोलीस, स्नाईपर्स तैनात करण्यात आले आहेत. आयझेनहॉवर पार्कमधील हे ३४,००० क्षमतेचे स्टेडियम सोमवारी श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यासह स्पर्धेचा पहिला सामना आयोजित करणार आहे. आयएसआयएसने टी-२० वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी एक व्हीडिओ जारी केला होता, ज्यावरून वर्ल्डकप सामन्यादरम्यान हल्ला होणार असल्याचे वृत्त समोर आले होते, त्यामुळे मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

हेही वाचा – T20 WC 2024: वर्ल्डकपमध्ये सुपर ओव्हरचा थरार; डेव्हिड व्हिसा ठरला नामिबियाच्या विजयाचा शिल्पकार

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
parks in navi mumbai city in worse condition
उद्याने बकाल; सुरक्षा धोक्यात; महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे नवी मुंबई शहरातील उद्यानांची दुरवस्था
police action on massage parlour misbehavior is going on in name of massage parlour
मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकारांवर कारवाईचा बडगा, वर्षभरात पोलिसांकडून ३३ गुन्हे दाखल
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
Shortage of public toilets in Pune city
वानवा.. स्वच्छतागृहांची
Comprehensive sanitation campaign begins in slums in Thane
ठाण्यातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीमेला सुरूवात

३ ते १२ जून दरम्यान या ठिकाणी होणाऱ्या सामन्यांचे सुरक्षेसह कोणत्याही दुर्घटना न घडता आयोजन होण्यासाठी नासाऊ काउंटी पोलिस विभाग लक्ष ठेवून आहे. या मैदानावर ९ जून रोजी भारताचा पाकिस्तानशी सामना होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयएसआयएस समर्थक गटाने या स्पर्धेला लक्ष्य करण्याची धमकी दिली होती, त्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. सुरक्षा उपायांमध्ये विशेषज्ञ स्नाईपर्ससह SWAT पथकाचा समावेश असेल. मैदानात साध्या वेशातील पोलीस अधिकारीही तैनात असतील.

हेही वाचा – हार्दिक-नताशाच्या घटस्फोट प्रकरणात मोठी अपडेट, पंड्याच्या बायकोने इन्स्टाग्रामवर पुन्हा केला बदल, ‘ते’ फोटो…

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बीबीसी स्पोर्टला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “इव्हेंटमधील प्रत्येकाची सुरक्षा ही आमची पहिली प्राथमिक जबाबदारी आहे आणि आमच्याकडे सर्वसमावेशक आणि मजबूत सुरक्षा योजना आहे. आम्ही आमच्या यजमान देशांमधील अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करत आहोत आणि जागतिक परिस्थितीचे सतत निरीक्षण आणि मूल्यांकन करत आहोत. विमानतळासारखी सुरक्षा व्यवस्था या स्टेडियमवर असणार आहे, ही पार केल्यानंतर चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळेल. हे स्टेडियम तयार करण्यासाठी ३० दशलक्ष डॉलर्स खर्च आला आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान होणाऱ्या हल्ल्याची बातमी मिळाल्यानंतर न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी सांगितले होते की, अधिकाऱ्यांनी या सामन्यांच्या सुरक्षिततेचे नियोजन करण्यासाठी अनेक महिने काम केले आहे. मी न्यूयॉर्क राज्य पोलिसांना सुधारित सुरक्षेत वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामध्ये कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांची उपस्थिती, वर्धित पाळत ठेवणे आणि तीव्र तपासणी प्रक्रिया समाविष्ट आहेत. सार्वजनिक सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि क्रिकेट विश्वचषक हा एक सुरक्षित आणि आनंददायक अनुभव असेल यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

Story img Loader