How can South Africa get knocked out in Super 8: टी-२० विश्वचषक २०२४मधील सुपर८ चे सामने सध्या खेळवले जात आहेत. यादरम्यान ८ संघांची दोन गटांत विभागणी केली आहे. यापैकी दुसऱ्या गटातील समीकरण थोडं गुंतागुंतीचं आहे. या संघात वेस्ट इंडिज, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे संघ आहेत. यापैकी दक्षिण आफ्रिकेने त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिज आणि इंग्लंडने प्रत्येकी एक एक सामना जिंकला आहे. तर अमेरिकेने दोन्ही सामने गमावले आहेत. यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत एकही सामना न गमावलेल्या आफ्रिकेचा संघ अजूनही विश्वचषकातून बाहेर पडू शकतो. कसं ते जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर८ सामन्यात वेस्ट इंडिजने अमेरिकेविरुद्ध ९ गडी राखून एकतर्फी विजय मिळवून उपांत्य फेरीत पोहोचण्याचे दुसऱ्या गटाचे गणित अधिक रंजक बनवले आहे. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिज संघासमोर १२९ धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी अवघ्या ६५ चेंडूत पूर्ण केले. या मोठ्या विजयासह, वेस्ट इंडिज संघाने नेट रन रेटमध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे जी आता १.८१४ वर पोहोचली आहे. वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील पराभवामुळे खराब झालेल्या नेट रन रेटमध्ये सुधारणा तर केलीच पण आता दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोरही अडचणी निर्माण केल्या आहेत. आफ्रिकेचा संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे ज्यात त्यांनी खेळलेले सर्व ६ सामने जिंकले आहेत.

हेही वाचा – VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!

दक्षिण आफ्रिका सध्या सुपर८ फेरीतील गुणतालिकेत ४ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ज्यामध्ये त्याचा नेट रन रेट ०.६२५ आहे. तर सध्या इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचे प्रत्येकी २ गुण असले तरीही आफ्रिकन संघाला त्यांच्या शेवटच्या सामन्यात विजयाची नोंद करणे आवश्यक आहे. इंग्लंडला सुपर८ मधील शेवटचा सामना अमेरिकेच्या संघाविरुद्ध खेळायचा आहे, जर जिंकले तर उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान निश्चित होईल. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना बाद फेरीसारखा असेल. जर आफ्रिकन संघ या सामन्यात हरला तर त्यांचा या टी-२० विश्वचषकातील प्रवास इथेच संपेल.

हेही वाचा – T20 WC 2024: हलाल मांस नसल्याने अफगाणिस्तानचे खेळाडू झाले शेफ; काय आहे नेमकं प्रकरण

दक्षिण आफ्रिकेसाठी यंदा २००७च्या वर्ल्डकपसारखं समीकरण

२००७ च्या टी-२० विश्वचषकातही दक्षिण आफ्रिकेसोबत असाच प्रकार घडला होता. जेव्हा भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे त्यांचा नेट रन रेट अधिक खराब झाला आणि त्यांना उपांत्य फेरीपर्यंतही मजल मारता आली नव्हती. २००७ विश्वचषकाच्या गट टप्प्यात अपराजित राहिल्यानंतर, सुपर८ मध्ये आफ्रिकन संघ इंग्लंड आणि न्यूझीलंडला पराभूत करण्यात यशस्वी झाला. परंतु स्पर्धेतील त्यांचा प्रवास भारताविरुद्ध ३७ धावांनी झालेल्या पराभवाने संपला.

हेही वाचा – IND v AFG: सूर्यकुमारचं नाव विसरला पत्रकार, वेगळ्याच नावाने हाक मारताच सूर्या म्हणाला; “अरे सिराज भाई तो…”; VIDEO व्हायरल

इंग्लंडचा संघ सुपर८ फेरीतील आपला शेवटचा सामना अमेरिकाविरूद्ध २३ जून रोजी सेंट लुसियाच्या मैदानावर भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळवला जाईल, तर वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका २४ जून रोजी किंग्सटाउन येथे भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजता होणार आहे.