T20 World Cup 2024 Super8 Explainer: यंदाच्या टी-२० विश्वचषकात पहिल्यांदाच २० संघ सहभागी झाले होते. या २० संघांना ४ गटांमध्ये विभागले होते. प्रत्येतक गटात ५ संघ होते आणि त्या गटातील प्रत्येक संघाचे ४ सामने खेळवले गेले. यातून जे टॉप-२ संघ असतील ते पुढील फेरीसाठी म्हणजेच सुपर८ साठी क्वालिफाय झाले. प्रत्येक संघाने आपली चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. त्यासह २० पैकी सध्या ११ संघ क्वालिफाय झाले असून एक संघ निश्चित होणं अद्याप बाकी आहे. यासह सुपर८ मधील सामने कसे निश्चित झाले? पुढील फेरीसाठी समीकरण कसं असणार? या व अशा अनेक प्रश्नांचा सविस्तर आढावा घेऊया.

सुपर८ मधील सामने कसे खेळवले जाणार?

How To Use Super Coins For Free OTT Subscription
Flipkart: फ्लिपकार्टवरून मोफत OTT सबस्क्रिप्शन कसे मिळवायचे? ‘ही’ पाहा सोपी प्रोसेस
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
Heinrich Klaasen hit maximum six ball gone out of stadium video viral in SAT20 2025
SA20 2025 : हेनरिक क्लासेनने मारला गगनचुंबी षटकार! चेंडू थेट स्टेडिमयच्या बाहेर रस्त्यावर पडला, अन् चाहत्याने…
Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभची पुराणकथा, इतिहास आणि ज्योतिषशास्त्र काय सांगते?
Fan who caught Kane Williamson's sixer with one hand wins Rs 90 lakh prize in SA20 2025 Match
SA20 2025 : मॅच पाहायला गेला आणि लखपती झाला, केन विल्यमसनच्या षटकाराने चाहत्याचं नशीब कसं बदललं?
loksatta kalachi ganit Sankranti Eclipse Zodiac
काळाचे गणित: संक्रांतीची तिथी?
Bigg Boss 18 Bigg Boss angry after Vivian dsena can chum darang refused to accept the ticket to final
Bigg Boss 18: विवियन डिसेना, चुम दरांगच्या ‘या’ निर्णयामुळे भडकले ‘बिग बॉस’; सर्व सदस्यांना दिल्या दोन शिक्षा

सुपर८ मधील सामने हे पहिल्या फेरीसारखेच गट सामने खेळवले जाणार आहेत. दोन्ही गटातील टॉप-२ संघ पुढील फेरीसाठी क्वालिफाय होणार आहेत. सुपर८ साठी पात्र ठरलेल्या ८ संघांना दोन गटात विभागले आहे, प्रत्येक गटात ४ संघ आहेत. या दोन्ही गटातील प्रत्येक संघाचे तीन सामने होतील आणि मग टॉप-२ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

हेही वाचा – IND vs CAN सामना रद्द झाल्याने सुनील गावसकर ICC वर भडकले, म्हणाले; “मॅच खेळवूच नका…”

सुपर८ साठी पात्र ठरलेले दोन्ही गटातील संघ
अ गट
A1 – भारत
B2 – ऑस्ट्रेलिया
C1 – अफगाणिस्तान
D2 – बांगलादेश/नेदरलँड्स

ब गट
A2 – अमेरिका
B1 – इंग्लंड
C2 – वेस्ट इंडिज
D1 – दक्षिण आफ्रिका

हेही वाचा – T20 WC 2024: भारत वि ऑस्ट्रेलिया सुपर८ फेरीत येणार आमनेसामने, ICCने केलं जाहीर; पाहा टीम इंडियाच्या सामन्यांचे वेळापत्रक

सुपर८ संघातील गटात कसे विभागले जातात?

विश्वचषकापूर्वी झालेल्या संघांमधील मालिंकामधून संघांच सीडिंग करण्यात आलं आहे. आयसीसीने या विश्वचषकात सीडिंग प्रणाली आणली होती. चारही गटांमध्ये प्रत्येकी दोन सीडेड संघ होते. अ गटातील पहिले दोन संघ हे Al आणि A2 असतील. ब गट पहिले दोन संघ B1 आणि B2 असतील पुढे. अशा प्रकारे चारही गटातील पहिले दोन संघ आयसीसीने निश्चित केले होते.

हेही वाचा – IND vs CAN: पाऊस नसतानाही का रद्द झाला भारत वि कॅनडा सामना? जाणून घ्या कारण

संघ सीडेड करणे म्हणजे काय?

आयसीसीने संघ सीडेड केल्यामुळे सुपर८ फेरीत कोणते संघ खेळतील यांचा त्यांना आधीच अंदाज असतो. म्हणजेच अ गटात भारतीय संघ होता ज्याला A1 म्हणून आयसीसीने सीडेड केलं होतं, त्यामुळे भारतीय संघ हा सुपर८ साठी पात्र होणारच हे आयसीसीला आधीच माहित होते. A1 असल्याने भारताचे सामने सुपर८ मध्ये C1, B2 आणि D2 संघाशी होतील हे आधीच निश्चित होतं.

प्रत्येक गटात आयसीसीने सीडेड केलेले संघ कोणते होते?

A1 – भारत
B1 – इंग्लंड
C1 – न्यूझीलंड
D1 – दक्षिण आफ्रिका

A2 – पाकिस्तान
B2 – ऑस्ट्रेलिया
C2 – वेस्ट इंडिज
D2 – श्रीलंका

हेही वाचा – IND W vs SA W: स्मृती मानधना ठरली टीम इंडियासाठी तारणहार; शतकी खेळीसह ऐतिहासिक कामगिरी करणारी दुसरी भारतीय फलंदाज

आयसीसीने सीडेड कलेले काही संघ पात्र ठरले नाहीत…

आयसीसीने सीडेड केलेले जे संघ पात्र ठरले नाहीत त्यांच्या जागी सीडेड न केलेल्या संघांना संधी मिळाली. उदाहरणार्थ. न्यूझीलंड (C1) क गटातून पात्र ठरू शकला नाही, त्यामुळे अफगाणिस्तानने सुपर एटसाठी C1 स्लॉट घेतला, तर वेस्ट इंडिजने (C2) त्यांचे सीड कायम ठेवले. त्याचप्रमाणे पाकिस्तानचा संघ पात्र न ठरल्याने A2 स्लॉट आता अमेरिकेचा आहे.

हेही वाचा – क्रिकेटमध्ये सेक्स ही अत्यंत सामान्य गोष्ट…’, अभिषेक नायरचे मुलाखतीत मोठे वक्तव्य, म्हणाला; “एवढं दडपण असतं की…”

गट सामन्यात प्रथम येण्याचा संघांना सुपर८ साठी फायदा नसेल

आयसीसीने सीडेड केलेल्या संघांमध्ये वेस्ट इंडिजची पात्रता अजूनही C2 सीड म्हणून आहे जी त्यांना स्पर्धा सुरू होण्यापूर्वी देण्यात आली होती. जरी ते गटात अव्वल असले तरीही सुपर एटमध्ये ते त्याच ठिकाणी खेळतील जिथे त्यांना सुपर८ साठी सीडेड करण्यात आले होते. दुर्दैवाने, याचा अर्थ असाही होतो की एकदा गटातील दोन पात्र झालेले संघ निश्चित झाले की, इतर सर्व सामन्यांमधील गुण ग्राह्य धरले जात नाहीत.

अ गट (भारत आणि यूएसए) आणि क गटातील (अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडीज) दोन्ही संघ आधीच सुपर एटसाठी पात्र झाल्याने उर्वरित सामने खेळल्यानंतरच्या गट स्थितीला विश्वचषकात गुणांसाठी ग्राह्य धरले जात नाही.

Story img Loader