What is Super 8 equation for Pakistan : न्यूयॉर्कमधील नवीन स्टेडियममध्ये भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ टी-२० विश्वचषक २०२४ मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. प्रथम, अमेरिकेने निकराच्या लढतीनंतर सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. यानंतर भारताने बाबर आझम अँड कंपनीचा सहा धावांनी पराभव करून गुणतालिकेतही घवघवीत यश मिळवले आहे. आता मात्र पाकिस्तान सुपर-८ मध्ये पोहोचू शकेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे उत्तर आहे हो. समीकरणारावर नजर टाकली तर पाकिस्तानचा संघ अजूनही सुपर-८ मध्ये पोहोचण्याच्या शर्यतीतून बाहेर नाही. भारताच्या दयेशिवाय पाकिस्तान संघ यापुढे साखळी फेरीच्या पुढे जाऊ शकत नाही. कसं ते जाणून घेऊया.
टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये एकूण चार गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटात पाच संघ आहेत. भारताच्या गटात पाकिस्तानशिवाय अमेरिका, आयर्लंड आणि कॅनडा यांचाही समावेश आहे. प्रत्येक संघाला साखळी टप्प्यात एकूण चार सामने खेळायचे आहेत. प्रत्येक गटातून फक्त दोन संघ सुपर-८ मध्ये प्रवेश करतील. ग्रुप-अ मध्ये पाहिल्यास, सर्व दोन सामने जिंकून भारत चार गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेनेही आपले दोन्ही सामने पाकिस्तान आणि कॅनडाचा पराभव करून जिंकले आहेत. उत्तम रनरेटच्या आधारे भारत अमेरिकेच्या पुढे आहे. पाकिस्तान आणि कॅनडाने आपले दोन्ही सामने गमावले आहेत. आयर्लंडने दोनपैकी एक सामना जिंकला आहे.
पाकिस्तान संघ सुपर-८ मध्ये कसा पोहोचेल?
पाकिस्तानला येथून सुपर-८ मध्ये आपले स्थान पक्के करायचे असेल तर त्याला आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकावेच लागतील. फक्त इतकेच नाही तर त्याचबरोबरर हे सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. कारण पाकिस्तानचा नेट रन रेट सध्या मायनसमध्ये आहे. अमेरिकेचा नेट रन रेट सध्या चांगला आहे. अशा स्थितीत बाबर आझम अँड कंपनीला हे दोन्ही सामने जिंकून नेट रन रेट सुधारावा लागेल. अन्यथा त्यांची डाळ शिजणार नाही.
हेही वाचा – IND vs PAK : आमिरविरुद्ध फलंदाजी करताना अर्शदीपचा कमालीचा आत्मविश्वास, विराट-रोहितही झाले अवाक्, पाहा VIDEO
पाकिस्तानला भारताच्या उपकाराची गरज –
सुपर-८ मध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तान संघाला भारताच्या उपकाराची गरज आहे. भारताच्या विजयासाठी प्रार्थना केल्याशिवाय पाकिस्तान संघ साखळी टप्प्यातून पुढील फेरी गाठू शकत नाही. आता भारताला १२ जूनला अमेरिकेशी आणि १५ जूनला कॅनडाचा सामना करायचा आहे. भारताने हे दोन्ही सामने जिंकावेत, अशी प्रार्थना पाकिस्तानला करावी लागेल. याशिवाय, अमेरिकेला पराभूत करण्याबरोबरच भारतीय संघाने त्यांचा नेट रन रेटही मोठ्या फरकाने पराभूत करून खराब केला पाहिजे, अशी त्यांची इच्छा आहे. असे जर झाले तरच त्याचा थेट फायदा पाकिस्तानला मिळेल.