भारतीय क्रिकेट संघाने २०२४ मध्ये अमेरिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर रोहित शर्मा आणि त्याच्या संघाला विजेतेपद मिळवण्याची मोठी संधी आहे. टीम इंडियाने अखेरचा टी-२० विश्वचषक २००७ मध्ये जिंकला होता. २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे आता भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कपमध्ये ११ वर्षांचा दुष्काळ संपवून पुन्हा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे.

अमेरिकेत मिळणाऱ्या सुविधांवर टीम इंडिया नाखूश?

भारतीय संघ टी-२० विश्वचषकासाठी अमेरिकेला पोहोचला असून खेळाडूंनी सरावला सुरूवात केली आहे. इतकेच नव्हे तर आणि संघाने खेळाडूंनीही याचे फोटो व्हीडिओही शेअर केले. पण एका रिपोर्टनुसार आता यजमान देश अमेरिकेत सरावासाठी ज्या सुविधा दिल्या जात आहेत यावर भारतीय क्रिकेट संघ खूश नसल्याचे समोर आले आहे. रिपोर्टनुसार, टीम इंडियाला सरावासाठी ज्या प्रकारची खेळपट्टी आणि इतर सुविधा दिल्या जात आहेत, त्या नीट नसल्याचे म्हटले जात आहे. टीम इंडियाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

MS Dhoni new look photo viral
MS Dhoni : ‘तपकिरी केस, हिरवा चष्मा आणि हलकी दाढी’, माहीच्या नव्या लूकने चाहत्यांना लावले वेड, फोटो व्हायरल
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
india vs pakistan womens t20 world cup match preview
पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत चुरस; महिला ट्वेन्टी२० विश्वचषकात आज भारत पाकिस्तान आमने-सामने
Ajna card stealing gang , mobile tower, Vasai,
वसई : मोबाईल टॉवरमधील आझना कार्ड चोरणारी टोळी गजाआड, परदेशातून गुन्ह्यासाठी व्हायचा वापर
chess olympiad 2024 grandmaster abhijit kunte interview
आता तुल्यबळ खेळाडूंची फळी निर्माण करण्यावर भर – कुंटे
‘आयपीएल’ मध्ये सहा खेळाडूंना कायम ठेवण्यास मान्यता | Approval to retain six players in IPL sport news
‘आयपीएल’ मध्ये सहा खेळाडूंना कायम ठेवण्यास मान्यता
PM Narendra Modi US visit, Narendra Modi US,
अमेरिकेने भारताला ‘गिऱ्हाईक’ समजू नये…
chess olympiad 2024, india women participants
बुद्धीबळ सम्राज्ञी… बुध्दीबळ ऑलिंपियाडमधल्या ‘त्या’ पाचजणी आहेत तरी कोण?

हेही वाचा – न्यूयॉर्कमध्ये ‘ढगाला लागली कळ…’ भर पावसात रोहित-द्रविडची पळापळ, VIDEO व्हायरल

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी कॅन्टियाग पार्कमध्ये देण्यात आलेल्या सुविधांबाबत इतके नाराज आहेत की त्यांनी याबाबत आयसीसीकडेही धाव घेतली आहे. मात्र, ‘कँटियाग पार्कमधील सराव सुविधांबाबत कोणत्याही संघाकडून कोणतीही तक्रार किंवा चिंता व्यक्त करण्यात आलेली नाही,’ असे आयसीसीचे म्हणणे आहे.

दोन महिने सतत रात्रीच्या वेळेत क्रिकेट खेळल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने सकाळच्या सराव सत्रांसह टी-२० विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. त्यांचे साखळी फेरीतील सर्व सामने अमेरिकेच्या वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता सुरू होणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एलिमिनेटरमध्ये पराभवानंतर कोहलीने वैयक्तिक कामासाठी ब्रेक घेतला असून शुक्रवारपर्यंत तो संघात सामील होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – मार्क वुडच्या बाऊन्सरवर आझम खानला दिसले तारे, डोळे बंद करून खेळताना विचित्र पद्धतीने झाला आऊट, पाहा VIDEO


भारताच्या कडक उन्हात फ्लडलाइट्सखाली सामने खेळल्यानंतर, खेळाडूंना आता सकाळच्या हवामानाशी जुळवून घ्यावे लागेल जेथे तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान असेल आणि आर्द्रता खूपच कमी असेल. या परिस्थितीशी जुळवून घेत संघाला सामने खेळायचे आहेत.