ICC T20 विश्वचष स्पर्धेतला ११ वा सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर पार पडली. या सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने पाकिस्तानवर पाच धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानने विजयासाठी १६० धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र अमेरिकेने १५९ धावा केल्या त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला अर्थात टाय झाला. त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये १९ धावांचं आव्हान दिलं. ज्यानंतर पाकिस्तानला १३ धावाच करता आल्या. सौरभ नेत्रावळकरने सुपर ओव्हरमध्ये विकेट काढल्याने अमेरिकेचा विजय सोपा झाला. या सगळ्यानंतर कॅप्टन बाबर आझमने काय म्हटलं आहे? पराभवाचं खापर कुणावर फोडलं आहे हे जाणून घेऊ.

पाकिस्तानची सुरुवातच पराभवाने

पाकिस्तानचा टी २० विश्वचषक मालिकेतला हा पहिलाच सामना होता. पाकिस्तानला हा सामना जिंकून विजयी सुरुवात करायची होती. मात्र तसं घडलं नाही. अमेरिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमने ४४, शादाब खानने ४० आणि शाहिनने केलेल्या २३ धावांच्या जिवावर पाकिस्तानला २० ओव्हर्समध्ये १५९ धावा करता आल्या. अमेरिकेसमोर पाकिस्तानने विजयासाठी १६० धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना करताना कॅप्टन मोनांक सिंहने ५० धावांची खेळी केली. अँड्रीज गॉसने ३५ धावा केल्या, तर स्टीवन टेलर १२ धावांवर बाद झाला. अमेरिकेला शेवटच्या षटकात १५ धावांची गरज होती. एरॉन जॉन्सने षटकार लगावला, पाचव्या बॉलवर एक रन काढून नितेशला बॅटिंग दिली. विजयासाठी ५ धावांची गरज होती त्यावेळी नितेशने चौकार मारला आणि सामना बरोबरीत सोडवला. ज्यानंतर सुपर ओव्हर झाली आणि अमेरिकेचा विजय झाला. पाकिस्तानची सुरुवातच या निमित्ताने पराभवाने झाली.

salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
Those who do not accept Hindu Rashtra should go to Pakistan says Dhirendrakrishna Shastri
हिंदू राष्ट्र मान्य नसणाऱ्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे, धीरेंद्रकृष्ण शास्त्रींचे वक्तव्य
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
Mohammad Rizwan Says I am only a captain for toss and presentation
Mohammad Rizwan : ‘मी फक्त टॉस आणि प्रेझेंटेशनसाठी कर्णधार…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य
Mithun Chakraborty gets threat from pakistani gangster Shahzad Bhatti
पाकिस्तानी गँगस्टरकडून मिथुन चक्रवर्ती यांना धमकी, मुस्लिमांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा उल्लेख करत म्हणाला…

हे पण वाचा- USA vs PAK: अमेरिकेचा पाकिस्तानावर रोमहर्षक विजय, सौरभ नेत्रावळकरच्या कामगिरीचा जयजयकार

बाबर आझमने पराभवाचं खापर कुणावर फोडलं?

“पॉवर प्लेच्या पहिल्या सहा ओव्हर्सचा फायदा आम्ही घेऊ शकलो नाही. मधल्या ओव्हर्समध्ये आम्ही विकेट्स गमावल्या. चांगल्या भागीदारीची गरज आम्हाला होता. पण चांगली कामगिरी करण्यात आम्ही अपयशी ठरलो. पॉवर प्लेमध्ये अमेरिकेच्या संघाने चांगली गोलंदाजी केली. ते आमच्यापेक्षा सरस होते त्यामुळे त्यांनी सामना जिंकला” असं बाबर आझमने म्हटलं आहे.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), उस्मान खान, फखर जमान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर आणि हरिस रौफ.

युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान. मात्र यानंतर क्रिकेट रसिक आणि सोशल मीडियावर अशी चर्चा घडते आहे.

या मुद्द्यांवरुन होतेय चर्चा

बाबर आझम संथ खेळला त्यामुळे त्याच्यावर टीका होते आहे. टी २० मध्ये तो टेस्ट मॅचप्रमाणे खेळला असं क्रिकेट रसिक म्हणत आहेत

बाबर हारिस रौफवर भडकला कारण शेवटच्या चेंडून १ बॉल पाच धावा असताना चौकार बसला.

सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचं क्षेत्ररक्षण अक्षरशः शाळकरी मुलं करतात तसं होतं. त्यावरुन त्यांना ट्रोल केलं जातं आहे.