टी-२० विश्वचषक २०२२ मधील भारतीय संघातील सदस्य असलेल्या दिनेश कार्तिकचे वडील सध्या त्यांच्या साधेपणामुळे चर्चेत आहेत. वास्तविक, ते आपल्या मुलाला भेटण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. ते जेव्हा पोहोचले, त्यावेळी कार्तिक संघासोबत सराव सत्रात भाग घेत होता. सरावाच्या मध्यभागी मुलाला भेटण्याऐवजी, त्याच्या वडिलांनी सामान्य लोकांप्रमाणे थांबणे चांगले मानले. तसेच सत्र संपल्यानंतर दोघांची भेट झाली.

मुलाचा फिनिशर रोल पाहण्यासाठी कार्तिकचे वडील कृष्णा कार्तिक ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. संघ सिडनीमध्ये सराव करत होता आणि त्यावेळी त्याचे वडील आले होते. पत्रकारांना याची माहिती मिळताच ते त्यांच्या मुलाखतीसाठी पोहोचले. मात्र, यावेळी डीकेच्या (दिनेश कार्तिक) वडिलांच्या साधेपणाने सर्वांनाच प्रभावित केले. दिनेश कार्तिक अशा खेळाडूंपैकी एक आहे, जो त्याच्या आई-वडिलांसोबत राहतो आणि अनेकदा त्याचे कुटुंबीयही त्याचा सामना पाहण्यासाठी येतात. कार्तिकची आईही स्टेडियममध्ये अनेकदा स्पॉट झाली आहे.

दिनेश कार्तिकचे वडील मुलाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचले –

दिनेश कार्तिकचे वडील कृष्णा कार्तिक आपल्या मुलाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या मुलाबद्दल काही गोष्टी सांगितल्या. नेदरलँड्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी कृष्णा कार्तिक आपल्या मुलाला भेटायला आले होते. कृष्णा कार्तिक यांना विश्वास आहे की, दिनेश कार्तिकसाठी टी-२० विश्वचषक शानदार ठरेल.

हेही वाचा – IND vs NED T20 World Cup: विराट-सुर्यकुमारची शानदार खेळी! भारताचा दुबळ्या नेदरलँड्सवर ५६ धावांनी दणदणीत विजय

वयाच्या ३७ व्या वर्षी त्याला खेळताना पाहणे, चमत्कारापेक्षा कमी नाही –

दिनेश कार्तिकचे कौतुक करताना त्याचे वडील म्हणाले की, ”या विश्वचषकानंतर काय होईल हे माहित नाही? वयाच्या ३७ व्या वर्षी त्याला भारताकडून खेळताना पाहणे माझ्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही. तो पुढच्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकात खेळला तर तो आमच्यासाठी बोनस असेल.”

हेही वाचा – IND vs NED T20 World Cup 2022 : सुपर-१२ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा टीम इंडिया एकमेव संघ

मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणारा शानदार सामना पाहण्यासाठी जगभरातील चाहते जमले होते. मात्र, कार्तिकचे वडील विमानात असल्याने सामना पाहण्यासाठी यावेळी पोहोचू शकले नाहीत. पाकिस्तानविरुद्ध डीके अवघ्या १ धावेवर करून यष्टिचीत झाला. सराव सत्रांमध्ये तो खूप घाम गाळताना दिसला आहे आणि विशेषतः अश्विन आणि चहलच्या फिरकी चेंडूंवर त्याने सराव केला होता. परंतु नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात त्याला स्थान मिळाले पण फलंदाजी करण्यासाटी संधी मिळाली नाही.