मधल्या फळीतील फलंदाज असलेल्या सूर्यकुमार यादवने २५ चेंडूंत केलेली नाबाद ६१ धावांची खेळी तसेच केएल राहुलने ३५ चेंडूंत ५१ धावांसहीत केलेल्या अर्धशतकांनंतर रविचंद्रन अश्विनच्या (२२ धावांत ३ बळी) फिरकी माऱ्याच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेला पराभूत केलं. टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ‘अव्वल १२’ फेरीतील अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेवर ७१ धावांनी विजय मिळवत आपल्या गटात अग्रस्थानी राहत भारताने दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयामध्ये मोलाचं योगदान देण्याऱ्या सूर्यकुमार यादवने चौफेर फटेबाजी करत चाहत्यांची मनं जिंकली. या फटकेबाजीसाठी सूर्यकुमारची तुलना दक्षिण अफ्रिकेचा माजी खेळाडू ए बी डेव्हिलियर्सशी केली जात आहे. मात्र या तुलनेवर सूर्यकुमारने भन्नाट उत्तर दिलं असून त्यावर डेव्हिलियर्सनेही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

नक्की पाहा >> Virat Kohli Salute Video: …अन् विराटनं मैदानातच ठोकला कडकडीत सॅल्यूट; जाणून घ्या हे सॅल्यूट सेलिब्रेशन असतं तरी काय

Matthew Breetzke world record with 150 Runs Inning on ODI debut For South Africa
SA vs NZ: दक्षिण आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रिट्झकेचा वर्ल्ड रेकॉर्ड, वनडे पदार्पणात ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Virat Kohli Shakes Hand with Ball Boy in IND vs ENG Cuttack ODI Boy Left Awestruck Video Viral
IND vs ENG: विराटच्या कृतीने बॉल बॉय झाला अवाक्, सीमारेषेजवळ कोहलीने असं काही केलं की… VIDEO होतोय व्हायरल
Trent Boult unique record 1st player to win four T20 titles with four different teams of the Mumbai Indians franchise
Trent Boult Unique Record : ट्रेंट बोल्टने केला जगातील सर्वात अनोखा विक्रम, एकाच फ्रँचायझीच्या चार संघांसह नोंदवला खास पराक्रम
Phil Salt departs for 43 after suicidal run out by Shreyas Iyer
IND vs ENG: आधी ३२ मी. वायूवेगाने धावला अन् रॉकेट थ्रोसह अय्यरने केलं रनआऊट, सॉल्टला महागात पडली एक धाव; पाहा VIDEO
Abhishek Sharma Highest T20I Score for India 135 Runs Breaks Many Records IND vs ENG 5th T20I
IND vs ENG: अभिषेक शर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये कोणत्याच भारतीय फलंदाजाला जमलं नाही ते करून दाखवलं
IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
U19 Eng vs SA bizarre run out as Aaryan Sawant video viral
U19 ENG vs SA : धक्कादायक! विचित्र रनआऊटच्या नादात थोडक्यात वाचला फिल्डर, VIDEO होतोय व्हायरल

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्माकडून (१५) सर्वाना मोठय़ा खेळीची अपेक्षा होती, मात्र त्याने या सामन्यातही निराश केले. यानंतर राहुल आणि विराट कोहली (२६ धावा) यांनी दुसऱ्या गडीसाठी भागीदारी रचत भारताला सुस्थितीत पोहोचवले. कोहली बाद झाल्यानंतर राहुलने अर्धशतक झळकावले. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि तितकेच षटकार लगावले. राहुल माघारी परतल्यानंतर संघात स्थान मिळालेल्या ऋषभ पंतलाही (३) चमक दाखवता आली नाही. मात्र सूर्यकुमारने दुसऱ्या बाजूने फटक्यांची आतषबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकार झळकावत टी-२० क्रिकेटमध्ये एका वर्षात हजार धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला.

नक्की वाचा >> Ind vs Eng Semifinal: भारत १० तारखेला इंग्लंडशी भिडणार! आकडेवारीचा कौल भारताच्या बाजूने, २२ वेळा आमने-सामने आले त्यापैकी…

या खेळीनंतर सूर्यकुमारशी दोन डावांच्या दरम्यान चर्चा करताना तू नावा मिस्टर ३६० डिग्री आहेस असा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला. मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात फटकेबाजी करण्याचं कौशल्य असलेल्या डिव्हेलियर्सची मिस्टर ३६० डिग्री अशी ओळख आहे. याच संदर्भातून सूर्यकुमारही अशाप्रकारे मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात चेंडू पोहचवू शकतो असा संदर्भ देणारी तुलना प्रश्न विचारणाऱ्याने केली. या प्रश्नाला सूर्यकुमारने त्याच्या फलंदाजी इतकेच सुंदर उत्तर दिले. “जगात केवळ एकच ३६० डिग्री खेळाडू आहे. मी फक्त त्याच्यासारखा खेळण्याचा प्रयत्न करत राहीन,” असं सूर्यकुमार म्हणाला. सूर्यकुमारच्या या उत्तराचं सर्वच स्तरांमधून कौतुक केलं जात आहे.

नक्की पाहा >> World Cup: चार फोटो, एक शब्द अन् १० हजारांहून अधिक शेअर्स… Ind vs Zim सामन्यानंतर विराटने केलेल्या पोस्टची चर्चा

अनेक क्रिकेटसंदर्भातील वेबसाईट्स आणि पेजेसने सूर्यकुमारच्या या विधानाच्या बातम्या आणि पोस्ट केल्या. यापैकी एका पोस्टवर खुद्द डेव्हिलियर्सने प्रतिक्रिया नोंदवली आहे. क्रिकट्रॅकर नावाच्या वेबसाईटने पोस्ट केलेल्या सूर्यकुमारच्या विधानावर डेव्हिलियर्सने ट्वीटरवरुन प्रतिक्रिया नोंदवली. डेव्हिलियर्सने सूर्यकुमारचं कौतुक केलं. “तू फारच वेगाने त्या दिशेने वाटचाल करतोयस मित्रा खरं तर त्याहूनही अधिक कौशल्यपूर्ण आहेस तू. आज फार छान खेळलास,” असा रिप्लाय डेव्हिलियर्सने सूर्यकुमारच्या विधानावर दिला आहे.

नक्की वाचा >> World Cup Final: भारत जिंकला! पाकिस्तानही उपांत्य फेरीत; Ind vs Pak ड्रीम फायनल्सची शक्यता वाढली; समजून घ्या नेमकं गणित

डेव्हिलियर्सचं हे ट्वीट ३५ हजारहून अधिक जणांनी लाइक केलं आहे. सूर्यकुमार हा यंदाच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये विराट कोहलीनंतर दुसऱ्या स्थानी आहे. भारताच्या आतापर्यंतच्या विजयात गोलंदाजांपेक्षा विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या फलंदाजीतील सातत्याचा खूप मोठा वाटा आहे. विराट कोहलीने आतापर्यंत ५ सामन्यांत ३ अर्धशतकांसह सर्वाधिक २४६ धावा केल्या आहेत. सूर्यकुमारनेही तीन अर्धशतकांच्या जोरावर २२५ धावा केल्या आहेत. कोहलीचा संयम आणि सूर्यकुमारची आक्रमकता हे भारताच्या विजयाचे जणू समीकरण बनले आहे.

नक्की वाचा >> World Cup 2022: “…तोच संघ वर्ल्डकप जिंकेल”; भारतीय संघाचा उल्लेख करत Semi-Finals आधी स्टुअर्ट ब्रॉडचं सूचक विधान

विशेषकरून सूर्यकुमारने आपल्या ३६० अंशांतल्या फटकेबाजीने डिव्हिल्यर्सची आठवण करून दिली आहे. कोहलीचा स्ट्राइक रेट १३८.९८,तर सूर्यकुमारचा १९३.९६ इतका राहिला आहे.

Story img Loader