आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ मध्ये रविवारी झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यात रोमहर्षक सामना झाला. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या या सामन्यात बांगलादेशने तीन धावांनी विजय मिळवला. गाबा येथील मैदानावर बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशच्या संघाने सात गडी गमावून प्रथम फलंदाजी करताना १५० धावा केल्या. बांगलादेशच्या सलामीवीर फलंदाज नजमुल हुसेन शांतोने शानदार ७१ धावांची धडाकेबाज खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झिम्बाब्वेला शेवटच्या षटकात विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होती. एगवारा याने चौकार-षटकार खेचत सामना झिम्बाब्वेच्या पक्षात आणला होता, मात्र षटकाच्या पाचव्या चेंडूवर तो बाद झाला. शेवटचा चेंडू नो बॉल दिल्याने झिम्बाब्वेकडे अजून एक संधी होती. पण ब्लेसिंग मुजरबानी ना चांगला शॉट खेळू शकला ना एकेरी धाव घेऊ शकला आणि त्यांनी हा सामना गमावला. सामनावीर तस्किन अहमद ठरला. असं पहिल्यांदाच झाले की खेळाडूंनी हातमिळवणी केली आणि परत खेळायला आले कारण नो बॉल ठरला. पण तरीही बांगलादेशच जिंकला.

नजमुल हुसेन शांतोने आपल्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. नजमुल हुसेन शांतो शिवाय अफिफ हुसैन हा बांगलादेश संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना हुसैनने १९ चेंडूत २९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. नजमुल हुसेन शांतोने ५५ चेंडूत ७१ धावांची तुफानी खेळी केली. त्याला झिम्बाब्वेचा सिकंदर रझाने ऑफ स्पिन गोलंदाजीवर बाद केले.

तत्पूर्वी,  सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा डाव पॉवर-प्ले मध्ये गडगडला. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी अतिशय नियंत्रित गोलंदाजी करत बांगलादेशचे दोन फलंदाज तंबूत पाठवले. ब गटात चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या बांगलादेश संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध संघाला ताबडतोब सुरुवात देणारे सौम्य सरकार व नजमुल हुसेन शांतो यांनी संघासाठी डावाची सुरुवात केली. झिम्बाब्वेकडून षटक टाकण्यासाठी आलेल्या मुजरबानी ब्लेसिंग याने आपल्या संघाला पहिले यश मिळवून देण्यासाठी फारसा वेळ लावला नाही. त्याने पॉवर प्ले मध्ये बांगलादेश संघाला सौम्य सरकार आणि लिटन दास यांच्या रूपाने दोन धक्के दिले होते. नागरवा रिचर्ड याला ही दोन गडी बाद करण्यात यश आले.

हेही वाचा :   T20 World Cup: ‘पाकिस्तानला हरवणे इतके…!’, नेदरलँड्सच्या प्रशिक्षकांनी बाबर आझम अँण्ड कंपनीला डिवचले

या मागील सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा एका धावेने पराभूत करत या स्पर्धेत आपले आव्हाव कायम राखले होते. यामुळे ते पुन्हा एकदा बांगलादेशविरुद्ध याची पुनरावृत्ती करतील आशा व्यक्त केली जात होती, मात्र बांगलादेश वरचढ ठरले.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup bangladesh ran to help pakistan zimbabwe lost by just three runs avw