मुंबई : इंग्लंडविरुद्ध गुरुवारी उपांत्य फेरीत झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाचे दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. त्यानंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघात मोठे बदल करण्याची, काही वरिष्ठ खेळाडूंना संघाबाहेर करण्याची मागणी केली जाते आहे. मात्र, कर्णधार रोहित शर्मा, तारांकित फलंदाज विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केल्यानंतरच भविष्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भूमिका घेतली आहे.

‘‘रोहित, कोहली आणि द्रविड ऑस्ट्रेलियाहून मायदेशी परतल्यानंतर आमच्यात बैठक होईल. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच ट्वेन्टी-२० संघाच्या भविष्याची दिशा ठरवली जाईल. आम्ही निर्णय घेण्यासाठी घाई करणार नाही. संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंनी त्यांचे विचार मांडल्यावरच ‘बीसीसीआय’ पुढील निर्णय घेईल,’’ असे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. 

Rohit Sharma Statement on India All Out At 46 and Batting First Decision After Winning Toss In Press Conference IND vs NZ
Rohit Sharma: “माझ्यामुळे संघाची ही स्थिती…”, रोहित शर्माचे भारत ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मोठे वक्तव्य, नाणेफेकीच्या निर्णयाबद्दल पाहा काय म्हणाला?
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Maratha reservation high court
मराठा आरक्षणविरोधातील याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्ण, आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकार आता भूमिका मांडणार
How much power does Noel Tata head of Tata Trusts have What are the challenges
नोएल टाटा आता टाटा न्यासांचे प्रमुख… त्यांच्याकडे किती अधिकार? आव्हाने कोणती?
MS Dhoni new look photo viral
MS Dhoni : ‘तपकिरी केस, हिरवा चष्मा आणि हलकी दाढी’, माहीच्या नव्या लूकने चाहत्यांना लावले वेड, फोटो व्हायरल
online rummy, High Court, State Govt,
ऑनलाईन रमी हा खेळ संधीचा की कौशल्याचा भाग ? राज्य सरकाला भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
Mohan Bhagwat JP Nadda
“भाजपाला पूर्वी RSS ची गरज होती, आता…”, नड्डांच्या वक्तव्यावर संघाची प्रतिक्रिया; म्हणाले, “कौटुंबिक वाद…”
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
नव्यांचे लाड करताना जुन्या कार्यकर्त्यांनाही संधी द्या! भाजप नेत्यांची नेतृत्वाकडे मागणी

ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या भारतीय संघात रोहित (वय ३५ वर्षे) व कोहली (३३) यांच्यासह दिनेश कार्तिक (३७), रविचंद्रन अश्विन (३६), सूर्यकुमार यादव (३२) आणि भुवनेश्वर कुमार (३२) या तिशीतील खेळाडूंचा समावेश होता. पुढील ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२४ साली होणार असून यापैकी काही खेळाडू तोपर्यंत क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारू शकतील. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने संघबांधणी करण्याचे आता संघ व्यवस्थापन आणि निवड समितीपुढे आव्हान आहे. भारताला ‘आयसीसी’ची स्पर्धा जिंकण्यात पुन्हा अपयश आल्यामुळे आता काही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतील. याचाच भाग म्हणून हार्दिक पंडय़ाला नेतृत्वाच्या जबाबदारीसाठी तयार केले जाते आहे.