टी२० विश्वचषक २०२२ मध्ये भारतीय क्रिकेट संघ विजयाच्या रथावर स्वार झाला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात नेदरलँडचा ५६ धावांनी पराभव केला. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारने या सामन्यात शानदार कामगिरी केली. भुवीने ३ षटकात केवळ ९ धावा देऊन २ बळी घेतले. तथापि, हे लक्षात घेण्यासारखे आहे की भुवीने त्याच्या स्पेलची पहिली दोन षटके निर्धाव टाकली आणि टी२० विश्वचषकात असे करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

भुवनेश्वरने केली कमाल

नेदरलँड्सविरुद्धच्या सुपर-१२ सामन्यात भुवनेश्वर कुमारने अनोखा विक्रम केला. भुवी नेदरलँड्सच्या डावातील पहिले षटक टाकण्यासाठी आला, आणि ते षटक त्याने निर्धाव टाकले. याशिवाय, जेव्हा तो डावातील तिसरे षटक टाकण्यासाठी आला तेव्हा त्याने या षटकातील एकाही चेंडूवर एकही धाव दिली नाही, शिवाय एक विकेटही घेतली. टी२० विश्वचषकात पहिली दोन षटके निर्धाव टाकणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. भारतासाठी टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भुवनेश्वरच्या आधी हरभजन सिंहने २०१२ मध्ये इंग्लंड विरुद्ध कोलंबोमध्ये दोन षटके निर्धाव टाकले होते. हरभजन नंतर जसप्रीत बुमराहने पाकिस्तान विरुद्ध मीरपूरमध्ये दोन षटके निर्धाव टाकले होते.

याआधी या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे

भुवनेश्वरपूर्वी असे इतर देशांचे अनेक गोलंदाज आहेत ज्यांनी टी२० विश्वचषकात हा पराक्रम केला आहे. इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज ग्रॅमी स्वानने २०१२ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध पहिले दोन षटके निर्धाव टाकले होते. त्याचवेळी नुवान कुलसेकराने २०१४ मध्ये नेदरलँडविरुद्ध हा पराक्रम केला होता. त्याच वर्षी श्रीलंकेच्या रंगना हेराथनेही न्यूझीलंडविरुद्ध हा पराक्रम केला होता. तर भुवनेश्वर कुमार अशी कामगिरी करणारा चौथा गोलंदाज ठरला आहे.

हेही वाचा :   T20 World Cup: रोहित शर्मा स्वत: च्या अर्धशतकी खेळीवर नाराज म्हणाला, “आम्ही थोडे…’

या यादीत भुवीचाही समावेश

दुसरीकडे, जर आपण टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटके टाकणाऱ्या गोलंदाजांबद्दल बोललो, तर भुवनेश्वर कुमार या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह पहिल्या क्रमांकावर आहे. बुमराहने या फॉरमॅटमध्ये एकूण ९ निर्धाव षटके टाकले आहेत. सध्या हा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे टी२० विश्वचषकात खेळत नाहीये. याशिवाय नुवान कुलसेकरा आणि मुस्तफिजुर रहमान यांनीही टी२० क्रिकेटमध्ये ६-६ निर्धाव षटके टाकले आहेत.

Story img Loader