टीम इंडियाचा दिग्गज केएल राहुलची बॅट टी२० विश्वचषकमध्ये शांत आहे. टीम इंडियाच्या शेवटच्या दोन सामन्यामध्ये राहुल काही खास करू शकला नाही. नेदरलँड्सविरुद्ध तर त्याने आपली विकेट भेट दिली असावी अशी फलंदाजी केली. राहुलने या स्पर्धेत आतापर्यंत केवळ १३ धावा केल्या आहेत. विराट कोहलीचा फॉर्म नव्हता त्यावेळेस जशी परिस्थिती होती विराटची त्याच मार्गावर सध्या केएल राहुलची वाटचाल सुरु आहे. अशा स्थितीत आता भारतीय उपकर्णधाराने विराट कोहलीप्रमाणे मेंटल कंडिशनिंग प्रशिक्षक पॅडी अप्टन यांची मदत घेतली आहे.

विशेष म्हणजे केएल राहुलने सराव सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती. राहुल पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध लढताना दिसत आहेत. एमसीजीमध्ये पाकिस्तानविरुद्ध संघर्ष केल्यानंतर राहुलने कोचिंग स्टाफसोबत खास नेट सेशनही केले जेणेकरून पुढील सामन्यात त्याला कोणतीही अडचण येऊ नये.

अप्टनने विराट कोहलीला खराब फॉर्ममधून बाहेर येण्यास मदत केली होती, आता राहुलकडे पाहता, असे दिसते की त्यालाही फॉर्ममध्ये येण्यासाठी पॅडी अप्टनच्या मदतीची आवश्यकता आहे. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी अप्टन राहुलसोबत खास संवाद साधणार आहेत. मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध लढल्यानंतर राहुलने कोचिंग स्टाफसोबत एका खास नेट सेशनमध्ये भाग घेतला. एका रिपोर्टनुसार, राहुलने आता टीम इंडियाचे मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी अप्टन यांच्याकडे मदत मागितली आहे.

हेही वाचा :  T20 World Cup: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्यात जो संघ जिंकेल तो ग्रुप मध्ये होईल अव्वल, जाणून घ्या समीकरण 

३० वर्षीय केएल राहुल फॉर्मात नाही. टी२० विश्वचषकातील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये त्याने एकूण १३ धावा केल्या. पाकिस्तानविरुद्ध तो ४ धावांवर बाद झाला, तर नेदरलँड्सविरुद्ध ९ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर तो मीकरेनच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाला. त्याचे चाहते मोठ्या खेळीची वाट पाहत आहेत. सध्या तो कर्णधार रोहित शर्मासह सलामीला उतरतो, पण लवकर विकेट गमावल्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांवर दबावाची समस्या निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत त्याने आता टीम इंडियाचे मेंटल कंडिशनिंग प्रशिक्षक पॅडी अप्टन यांच्याकडे मदत मागितली आहे.

Story img Loader