भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीपूर्वी, इंग्लंडचा खेळाडू बेन स्टोक्स माध्यमांशी संवाद साधत होता. जिथे त्याने झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात भारताच्या मिस्टर ३६० डिग्री सूर्यकुमार यादवच्या उत्कृष्ट खेळीबद्दल वक्तव्य केले. खरं तर, माध्यमांशी बोलताना स्टोक्स म्हणाला, “सूर्यकुमार यादवने झिम्बाब्वेविरुद्ध मारलेल्या फटक्यांवर माझा अजूनही विश्वास बसत नाही. असे फटके एखादा तयारीचा कसलेला फलंदाजच मारू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सूर्यकुमार यादवबद्दल बोलताना स्टोक्स म्हणाला, “सूर्यकुमार यादव एक चतुर फलंदाज असून तो गोलंदाजाच्या डोक्यात काय चालू आहे याचा विचार आधीच करून त्यानुसार फटके मारतो. जेव्हा तो काही आश्चर्यचकित करणारे फटके खेळतो तेव्हा गोलंदाजासह इतरांना देखील डोके खाजवायला म्हणजेच विचार करायला भाग पाडतो.” त्याचवेळी तो विराट कोहलीबद्दल बोलताना म्हणाला की “तो खूप उच्च दर्जाचा क्लासिक फलंदाज आहे.”

बेन स्टोक्स म्हणाला, “आम्ही तुम्हाला सांगतो की, विराट कोहली सारख्या जागतिक दर्जाच्या अष्टपैलू खेळाडूमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देण्याची ताकद असते. उपांत्य फेरीत इंग्लंडचा भारताशी सामना होईल तेव्हा बरेच काही पणाला लावून खेळ दाखवावा लागणार आहे. सामन्यातील एकही चूक इंग्लंडच्या पराभवास कारणीभूत ठरू शकते.” बेन स्टोक्स ‘मेन इन ब्लूविरुद्ध’ उत्तम कामगिरी करण्यास उत्सुक आहे.

हेही वाचा :  ICC हॉल ऑफ फेममध्ये या तीन दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्यात आला, जाणून घ्या 

तत्पूर्वी मार्क वुडने उपांत्य फेरीच्या पात्रतेनंतर ब्रिटीश माध्यमांना सांगितले की, “बेन स्टोक्स एक चांगला माणूस आणि चांगला खेळाडू आहे ज्याला कठीण परिस्थितीत कसे तोंड द्यायचे हे माहित आहे. मला आठवत आहे की लोकांनी त्याला विचारले तुझी खराब कामगिरी कधी तू सुधारणार तुझ्यामुळे संघाला नुकसान होत आहे, परंतु जेव्हा संघाला त्याची आवश्यकता असते तेव्हा तो उभा राहतो. म्हणूनच आमच्या संघात आहे.”

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup england all rounder ben stokes has praised the batting of suryakumar yadav and virat kohli avw
Show comments