टी२० विश्वचषकाच्या सुपर-१२ सामन्यात आज इंग्लंड आणि आयर्लंडचे संघ आमनेसामने आहेत. मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत असून इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. आयर्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना १५७ धावा केल्या. इंग्लंडने आपल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाचा ५ गडी राखून पराभव केला. हा सामना इंग्लडने जिंकला तर त्यांचे पारडे गुणतालिकेत आणखी भक्कम होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने आयर्लंडचा डाव १५७ धावांत गुंडाळला. आयर्लंडच्या संघाने एकदा १२ षटकांत २ बाद १०३ धावा केल्या होत्या. यानंतर संघाचे उर्वरित आठ फलंदाज ५५ धावा जोडून पॅव्हेलियनमध्ये परतले. आयर्लंडकडून कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने सर्वाधिक ६२ धावा केल्या. फिरकीपटू लियाम लिव्हिंगस्टोन आणि वेगवान गोलंदाज मार्क वुड यांनी इंग्लंडकडून शानदार गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

पॉल स्टर्लिंगच्या रूपाने आयर्लंडला पहिला धक्का बसला. त्याला मार्क वुडने सॅम करनच्या हाती झेलबाद केले. स्टर्लिंगने आठ चेंडूंत १४ धावा केल्या. त्याच्यानंतर लॉर्कन टकर तंबूत परतला. २७ चेंडूत ३४ धावा करून टकर धावबाद झाला. त्याने बलबर्नीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. टकर १०३ धावा करून बाद झाला. या धावसंख्येवर हॅरी टॅक्टर बाद झाला. दोन चेंडूंचा सामना केल्यानंतर खाते न उघडता तो तंबूत परतला. त्याला मार्क वुडने जोस बटलर करवी झेलबाद केले.

आयर्लंडने संघात एक बदल केला. सिमी सिंगच्या जागी फिओन हँडचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, इंग्लंडने कोणताही बदल केलेला नाही. नाणेफेकीनंतर मेलबर्नमध्ये पाऊस सुरू झाला. त्यामुळे सामना उशिरा सुरू झाला.