भारत-पाकिस्तान यांच्यात जेव्हा कधी सामना होतो, तेव्हा त्यात रोमांच भरलेला असतो. आयसीसी टी२० विश्वचषकात दोन्ही संघांनी एकमेकांशी खेळून सुरुवात केली. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. यानंतर पाकिस्तान संघाला झिम्बाब्वेकडून अत्यंत लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. सलग दोन पराभवानंतर त्याचा स्पर्धेतील प्रवास संपल्याचे मानले जात होते. “अल्लाहच्या कृपेने आणि तीन विजयांच्या आशीर्वादावर पाकिस्तानने उपांत्य फेरीत स्थान पक्के केले.” असे मत माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले. पुढे तो म्हणाला की, “पाकिस्तान संघाच्या विजयासाठी मी खूप उत्सुक आहे आणि भारताला अंतिम फेरीत पाहण्याची मला इच्छा आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेदरलँड्सविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या पराभवावर पाकिस्तानच्या संघाची उपांत्य फेरी गाठण्याची शेवटची आशा उरली होती. रविवारी टी२० विश्वचषकात आणखी एक अपसेट पाहायला मिळाला. यानंतर बांगलादेशला प्रथम पाकिस्तानने ८ विकेट्स १२७ धावांवर रोखले आणि नंतर १८.१ षटकात ५ विकेट गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह पाकिस्तानने उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले.

पाकिस्तानचा माजी गोलंदाज अख्तरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात तो म्हणाला, “या स्पर्धेत कोणत्याही एका संघाची कामगिरी दमदार राहिलेली नाही, कोणत्याही संघाने वर्चस्व गाजवलेले नाही. सर्वच संघ खराब खेळले. ऑस्ट्रेलियाचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला, तर इंग्लंडचा संघही आपली सर्वोत्तम कामगिरी करताना दिसत नाही. पाकिस्तान संघानेही आजवर चांगला खेळ दाखवला नाही पण आज आणि शेवटच्या दोन सामन्यात संघाने चांगली कामगिरी केली आहे.”

हेही वाचा :  T20 World Cup 2022: ‘उपांत्य फेरीत जरी पोहचलो तरी…’भारतीय संघातील काही खेळाडूंवर आकाश चोप्राने उपस्थित केले प्रश्न 

शोएब अख्तर म्हणाला- पाकिस्तान भारताविरुद्ध फायनल खेळेल

पाकिस्तानला उपांत्य फेरीतून बाहेर काढणाऱ्यांना पाकिस्तानच्या माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी आधी त्यांच्यावर आगपाखड केली. विशेष म्हणजे खुद्द शोएब अख्तरचाही त्या यादीत समावेश होता. नंतर मात्र पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहचल्यावर सर्वांचे शब्द बदलले. शोएब म्हणतो, “सर्व संघांनी अप्रतिम क्रिकेट खेळले. बांगलादेश, नेदरलँड, झिम्बाब्वे यांनी अप्रतिम क्रिकेट खेळले. जगातील सर्वजण म्हणत होते की पाकिस्तान बाहेर आहे. बघा, उपांत्य फेरीत पोहोचलो आणि फायनलमध्ये पुन्हा भेटू शकतो. उपांत्य फेरीत आमचा पराभव झाला नाही तर भारताशी अंतिम फेरीत आमची भेट नक्की होणार.” असे मत त्याने व्यक्त केले.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup former pakistan fast bowler shoaib akhtar pakistan team surprisingly reached the semi finals his challenged the indian team avw