टी२० वर्ल्डकप अंतिम टप्प्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा धुव्वा उडवत पहिल्यांदाच वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. आज रात्री भारत आणि इंग्लंड समोरासमोर आहेत. टी२० वर्ल्डकपच्या व्यासपीठावर अनेक नवे विक्रम पाहायला मिळाले. अनुभवी शिलेदारांनी आपला खास ठसा उमटवला. अफगाणिस्तानने सेमी फायनलमध्ये धडक मारत इतिहास घडवला. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत अफगाणिस्तानने केलेली वाटचाल सगळ्यांनाच प्रेरणादायी अशी आहे. दक्षिण आफ्रिकेने चोकर्स टॅग बाजूला सारत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. भारतीय संघ सातत्यपूर्ण प्रदर्शन करत आहे. टी२० वर्ल्डकपच्या हिरोंबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? डोकं चालवा आणि लोकसत्ता टी२० हिरो क्विझ सोडवा!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघाने २००७ मध्ये झालेला पहिलावहिला टी२० वर्ल्डकप जिंकला होता. २००९ मध्ये पाकिस्तानने श्रीलंकेला नमवत जेतेपदावर नाव कोरलं. २०१० मध्ये इंग्लंडने पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया चीतपट करत जेतेपदावर कब्जा केला. २०१२ मध्ये वेस्ट इंडिजने श्रीलंकेला हरवत जेतेपद पटकावलं. २०१४ मध्ये श्रीलंकेने भारतीय संघाला नमवण्याची किमया केली आणि जेतेपद नावावर केलं. २०१६ मध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्ध थरारक विजय मिळवत पुन्हा एकदा जेतेपदाची कमाई केली. पाच वर्षानंतर २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा टी२० प्रकारात पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं. २०२२ मध्ये इंग्लंडने पाकिस्तानला हरवत जेतेपद नावावर केलं.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup heroes quiz apply your brain solve the quiz psp