Sunil Gavaskar Reacts To KL Rahul Form In T20 WC: भारताचा उपकर्णधार के. एल राहुल टी २० विश्वचषकात आपल्या फॉर्मपासून भरकटलेला दिसत आहे. टी २० सामन्यांमध्ये राहुलला काही केल्या धावांचं कोडं सोडवता आलेलं नाही. भारत विरुद्ध पाकिस्तान (०), भारत विरुद्ध नेदरलँड (९) ते नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यातही (९) के. एल. राहुलची खेळी निराशाजनकच होती. यावरून राहुलला काही काळासाठी भारतीय संघातून ब्रेक द्यावा व त्याच्या ऐवजी ऋषभ पंतला संधी द्यावी अशीही मागणी होत आहे. के. एल. राहुलच्या या फॉर्मवरून, भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनीही स्पष्ट शब्दात भाष्य केले आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणतात की, “तो (कोहली) सीनियर खेळाडू आहे, प्रत्येक फॉरमॅटमध्ये त्याच्याकडेधावांचे रेकॉर्ड आहेत. ऑस्ट्रेलिया हे कोहलीचे आवडते मैदान आहे तो इतरांना मार्गदर्शन करू शकतो, चेंडू कुठे फिरणार हे आपल्याला ठाऊक नसते, अनेकजण आपल्याला हवा तसा चेंडू येण्याची वाट पाहतात जर शक्य झाले नाही तर सोडून देतात पण टी २० फॉरमॅटमध्ये चेंडू सोडणे हा पर्याय कधीच फायद्याचा नसतो.
Video: आता पाकिस्तान जिंकणं अशक्यच पण.. IND vs SA नंतर शोएब अख्तर यांची टीम इंडियावर कटू टीका
इंडिया टुडेशी संवाद साधताना विश्वचषकात राहुलचा फॉर्म नेमका कशामुळे बिघडला आहे? त्याच्या खेळात काही तांत्रिक दोष आहे का? या प्रश्नांवर सुनील गावस्कर यांनी उत्तर दिले आहे. गावस्कर म्हणतात की, के. एल राहुलच्या खेळापेक्षा मानसिक क्षमतेत दोष आहे. राहुलला स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास नाही तोच अविश्वास त्याच्या खेळात दिसून येत आहे.
“राहुलला धावा काढणे शक्य होत नाही हे जेव्हा मी पाहतो तेव्हा मला हेच वाटते की, राहुलला स्वतःमध्ये कोणती क्षमता आहे हेच माहीत नाही, त्याचा स्वतःवर विश्वास नाही. तो एक कर्तबगार खेळाडू आहे, त्याने आपला दृष्टिकोन बदलायला हवा, आक्रमक पवित्रा स्वीकारायला हवा, “मी जाईन आणि पार बॉलचं कव्हर निघेपर्यंत फटकेबाजी करेन” असा खेळ राहुलने दाखवायला हवा.” असेही गावस्कर पुढे म्हणाले आहेत.