भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेल्या सुपर-१२ फेरीमधील दुसऱ्या गटातील सामन्यामध्ये भारताने पाच धावांनी विजय मिळवला. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारताने हा सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारताचा सालामीवर के. एल. राहुलने केलेलं दमदार अर्धशतकं आणि विराट कोहलीच्या नाबाद ६४ धावांच्या जोरावर भारताने १८४ धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेश धावांचा पाठलाग करत असताना सातव्या षटकामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि सामना थांबवण्यात आला.
नक्की वाचा >> Ind vs Ban: बॅट, बॉलऐवजी हातात ब्रश घेत ‘त्याने’ भारतीय संघाला जिंकून दिला सामना; जाणून घ्या या व्यक्तीनं नेमकं केलं तरी काय
अर्ध्या तासानंतर डवर्थ लुईसच्या नियमानुसार १६ षटकांमध्ये १५१ धावांचं लक्ष्य बांगलादेशला देण्यात आलं. मात्र बांगलादेशला १४५ धावांपर्यंत मजल मारता आली आणि त्यांनी हा सामना गमावला. पहिल्या सात षटकांमध्ये ६६ वर शून्य बाद वरुन भारताने हा सामना जिंकल्याबद्दल गोलंदाजांचं कौतुक केलं जात आहे. त्यातच भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने चार षटकांमध्ये ३८ धावांच्या मोदबल्यात दोन महत्त्वाच्या गड्यांना बाद करत मोलाची कामगिरी केली.
नक्की वाचा >> विश्लेषण: भारताने बांगलादेशविरुद्ध विजय कसा खेचून आणला? उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित का?
पावसाच्या आधी आणि नंतर भारतीय संघांच्या खेळामध्ये फार फरक दिसून आल्याचं अप्रत्यक्षपणे कर्णधार रोहित शर्मानेही मान्य केलं. “मी एकाच वेळी शांत आणि थोडा बेचैन होतो. एक संघ म्हणून आम्ही शांतपणे आमच्या नियोजित प्लॅनप्रमाणे मैदानात खेळणं आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं होतं. त्यांचा एकही गडी बाद झाला नव्हता. त्यांच्याकडे १० विकेट्स शिल्लक असल्याने सामन्याचा निकाल कोणत्याही बाजूने लागणं शक्य होतं. मात्र पावसाच्या ब्रेकनंतर आम्ही चांगली कामगिरी केली,” असं रोहित म्हणाला.
नक्की पाहा >> Ind vs Ban: बांगलादेशने दिनेश कार्तिकची विकेट ढापली? ‘थर्ड अंपायर आंधळा आहे का?’ चाहत्यांचा Video शेअर करत प्रश्न
रोहित शर्माने सामन्यानंतर गोलंदाजीबद्दल भाष्य करताना मोहम्मद शमीचं एक षटक बाकी असतानाही २० वं आणि महत्त्वपूर्ण षटक टाकण्याची जबाबदारी अर्शदीपला का दिली यासंदर्भातील माहिती दिली. “जेव्हा त्याच्याबद्दल विचार केला तेव्हा बुमराह नसल्याने कोणाला तरी संघासाठी ही जबाबदारी स्वीकारावी लागेल असा विचार आम्ही केला. त्यामधूनच अर्शदीपची निवड या कामगिरीसाठी (शेवटचं षटक टाकण्यासाठी) केली,” असं रोहित म्हणाला.
नक्की पाहा >> Ind vs Ban: के. एल. राहुलचा हा थ्रो ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट; Rain Break नंतर दुसऱ्याच चेंडूवर काय घडलं पाहा Video
“इतक्या तरुण खेळाडूने अशावेळी समोर येऊन ही जबाबदारी स्वीकारणं साधी गोष्ट नाही. मात्र आम्ही त्याला यासाठी तयार केलं आहे. मागील नऊ महिन्यांपासून तो हे करतोय. शमी आणि तो या दोघांपैकी कोणाला निवडायचं असा प्रश्न आमच्यासमोर होता. त्यामुळे आम्ही यापूर्वी अशी कामगिरी करणाऱ्याला प्राधान्य देत अर्शदीपची निवड केली,” असं रोहित म्हणाला.
नक्की वाचा >> IND vs BAN: पराभवानंतर बांगलादेशच्या खेळाडूचा विराट कोहलीवर गंभीर आरोप, म्हणाला “मैदानात खोटं…”
जसप्रीत बुमराह भारतीय संघात असताना तो शेवटचं षटक टाकतो. सामान्यपणे शमी हा पेनल्टीमेट म्हणजेच १९ वं षटकं टाकतो. तर अर्शदीप हा अगदी आशिया चषकापासून ते अगदी या विश्वचषकामध्येही २० वं षटक टाकणाऱ्या गोलंदाजांपैकी एक असल्याने त्याची निवड करण्यात आल्याचं रोहितने स्पष्ट केलं.