भारत आणि इंग्लंडमध्ये उद्या तर पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान आज उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. आज पाकिस्तान आणि न्यूझीलंड भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरु होणार आहे. सिडनीच्या मैदानात अंतिम सामन्यात प्रवेश करण्याच्या उद्देशाने हे दोन्ही संघ उतरतील. या सामन्यामध्ये पाकिस्तानचं पारडं जड दिसत असलं तरी न्यूझीलंड सध्या भन्नाट कामगिरी करत असून हा सामना चुरशीचा होईल असं चित्र दिसत आहे.
नक्की वाचा >> सुंदर दिसत नाहीस तरी बुमराहला कसं पटवलं? विचारणाऱ्या ट्रोलरला संजना गणेशनचं उत्तर; म्हणाली, “तू स्वत: चप्पलेसारखा…”
अनेक चाहत्यांनी अंतिम सामन्यामध्ये भारत आणि पाकिस्तानचा एकमेकांसमोर असावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरही तशाप्रकारची चर्चा आहे. मात्र या सामन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंडचा अडथळा अनुक्रमे पाकिस्तान आणि भारताला पार करावा लागणार आहे. असं असतानाच या सामन्याबद्दल एका भारतीय पत्रकाराने इंग्लंडचा जलद गोलंदाज बेन स्टोक्सला प्रश्न विचारला. या प्रश्नावर बेन स्टोक्सनेही अगदी भन्नाट उत्तर दिलं.
नक्की वाचा >> T20 World Cup: …तर इंग्लंडविरुद्ध मैदानात न उतरता भारतीय संघ थेट वर्ल्डकप फायनल खेळणार
भारत आणि पाकिस्तानदरम्यान अंतिम सामन्या होण्याच्या शक्यतेबद्दल चर्चा सुरु आहे. मात्र या सामन्यात इंग्लंड अडसर ठरेल का अशा अर्थाने स्टोक्सला प्रश्न विचारण्यात आला. भारत आणि इंग्लंडच्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी चर्चा करताना हा प्रश्न स्टोक्सला विचारण्यात आल्याने त्याने हसतच या प्रश्नाचं उत्तर दिलं.
नक्की वाचा >> World Cup Final: भारत जिंकला! पाकिस्तानही उपांत्य फेरीत; Ind vs Pak ड्रीम फायनल्सची शक्यता वाढली; समजून घ्या नेमकं गणित
“भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना झाला तर ती तुमच्यासाठी (भारतीय चाहत्यांसाठी) आनंदाची बातमी असेल. खरं तर हा सामना होईल की नाही मला ठाऊक नाही. आम्ही इथे फक्त गुरुवारचा (भारताविरुद्धचा) सामना जिंकण्याच्या उद्देशाने आलो आहोत,” असं स्टोक्सने सांगितलं.
नक्की वाचा >> T20 World Cup Mr 360: “एकच मिस्टर ३६० असून मी…”, म्हणणाऱ्या सूर्यकुमारला डेव्हिलियर्सचा रिप्लाय; म्हणाला, “तू फारच…”
विराट कोहलीच्या कामगिरीबद्दल स्टोक्सला विचारण्यात आलं. कोहलीबद्दल बोलताना स्टोकने, “धावा आणि सामने पाहून त्याची कामगिरी कशी आहे हे दिसून येतं. त्याने सातत्याने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हे करुन दाखवलं आहे,” असं म्हटलं.