टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. उभारत हा दुसऱ्या गटातील अव्वल संघ म्हणून पात्र ठरला असून इंग्लंड पाहिल्या गटामध्ये दुसऱ्या स्थानी राहत पात्र ठरल्याने हे दोन्ही संघ अंतिम सामन्यासाठी एकमेकांविरोधात खेळणार आहेत. हा सामना १० नोव्हेंबर म्हणजे गुरुवारी ॲडलेडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. याच सामन्याची तयारी सध्या दोन्ही संघातील खेळाडू करत आहे. यंदाच्या विश्वचषकामध्ये तुफान फलंदाजी करणाऱ्या विराटनेही नेट्समध्ये सराव करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे या फोटोवर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने एक मजेदार कमेंट केली आहे.
नक्की वाचा >> T20 World Cup: …तर इंग्लंडविरुद्ध मैदानात न उतरता भारतीय संघ थेट वर्ल्डकप फायनल खेळणार
विराटने नेट्समध्ये फटकेबाजी करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला विराटने ‘या सर्व प्रोसेसचा आनंद घेत आहे,’ अशी कॅप्शन दिली आहे. विराटच्या या व्हिडीओमध्ये तो नेट्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फटके मारताना दिसत आहे. अगदी स्ट्रे ड्राइव्ह तर कधी पूलचा शॉट मारताना विराट व्हिडीओत दिसून येत आहे. विराटच्या या व्हिडीओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज आणि हजारोंच्या संख्येने लाइक्स आहेत. मात्र या व्हिडीओवर एका स्पेशल व्यक्तीने कमेंट केली आहे.
नक्की वाचा >> T20 World Cup Mr 360: “एकच मिस्टर ३६० असून मी…”, म्हणणाऱ्या सूर्यकुमारला डेव्हिलियर्सचा रिप्लाय; म्हणाला, “तू फारच…”
इंग्लंडचा माजी कर्णधार आणि एकेकाळी इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये विराटच्या संघातून खेळलेल्या केविन पीटरसनने विराटच्या या व्हिडीओवर कमेंट करत त्याच्याकडे एक विनंती केली आहे. “कृपा करुन तू गुरुवार हा विश्रांतीसाठी ठेव मित्रा! तुला माहितीय माझं तुझ्यावर प्रेम आहे तरी कृपा करुन गुरुवारी विश्रांतीच घे,” असं पीटरसनने म्हटलं आहे. या कमेंटमध्ये त्याने शेवटी हार्टचा इमोजीही वापरला आहे. पीटरसनच्या या कमेंटचा संदर्भ भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याशी आहे. गुरुवारी इंग्लंडविरोधात फार खेळू नकोस आराम कर अशी मजेदार विनंती वजा मागणी पीटरसनने केली आहे. पीटरसनच्या या कमेंटला १३ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.
नक्की वाचा >> World Cup 2022: “…तोच संघ वर्ल्डकप जिंकेल”; भारतीय संघाचा उल्लेख करत Semi-Finals आधी स्टुअर्ट ब्रॉडचं सूचक विधान
विराटच्या या पोस्टवर अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खाननेही कमेंट केली असून त्याने बॅट आणि बॉलचा स्पर्श होतो तेव्हा येणारा आवाज फारच सुंदर असल्याचं म्हटलं आहे. तर सुर्यकुमार यादवने या व्हिडीओवर कमेंट करताना, “अंगार” असं म्हटलं आहे. सुर्यकुमारने शक्ती दाखवणारा दंडांचा इमोजीही वापरला आहे.
नक्की वाचा >> Ind vs Eng Semifinal: भारत १० तारखेला इंग्लंडशी भिडणार! आकडेवारीचा कौल भारताच्या बाजूने, २२ वेळा आमने-सामने आले त्यापैकी…
विराटने पोस्ट केलेला व्हिडीओ तुम्हीही पाहा…
भारत आणि इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण २२ टी-२० सामने झाले असून भारताने त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक सामने जिंकले आहेत. भारत आणि इंग्लंडविरोधातील सामना जो संघ जिंकेल तो रविवारी म्हणजेच १३ तारखेला पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील विजेत्या संघाशी म्हणजेच पाकिस्तान किंवा न्यूझीलंडविरोधात अंतिम सामना खेळेल.