T20 World Cup Team India Score Board: भारताचा उपकर्णधार के. एल राहुल मागील काही काळापासून आपल्या फॉर्मपासून भरकटलेला दिसत आहे. टी २० सामन्यांमध्ये राहुलला काही केल्या धावांचं कोडं सोडवता आलेलं नाही. आजच्या भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यातही राहुल अवघ्या ९ धावा करून तंबूत परतला तर यंदाच्या टी २० विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यातही राहुलला अवघ्या ४ धावा करता आल्या होत्या. इतकंच नव्हे तर आशिया चषक, ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका याही टी २० सामन्यात के. एल. राहुलचा खेळ थंडच पडला होता. केवळ टी २० नव्हे तर एक दिवसीय सामना व टेस्ट सामन्यांमध्येही राहुल अपयशी ठरत आहे. राहुलचा हा खेळ पाहून अलीकडे काही चाहत्यांनाही राहुलवर टीका केली आहे.
ट्विटरवर अनेकांनी राहुलला ट्रोल केले आहे मात्र राहुल अद्यापही त्यांना आपल्या खेळाने शांत करू शकला नाही. टी २० विश्वचषकाच्या आधी दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सामन्यात कुठेतरी राहुलचा खेळ सुधारताना दिसत होता. पहिल्या सामन्यात राहुलने ५६ चेंडूत ५१ धावा तर दुसऱ्या सामन्यात २८ चेंडूत ५७ धावा काढल्या होत्या मात्र आता पुन्हा विश्वचषकात राहुलच्या धावांची गाडी रुळावरून घसरलेली दिसत आहे.
के. एल. राहुलच्या टी २० सामन्यातील धावा
- भारत विरुद्ध हॉंगकॉंग (आशिया चषक)- ३९ चेंडूत ३६ धावा
- भारत विरुद्ध पाकिस्तान (आशिया चषक) – २० चेंडूत २८ धावा
- भारत विरुद्ध श्रीलंका (आशिया चषक)- ७ चेंडूत ६ धावा
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान (आशिया चषक)- ४१ चेंडूत ६२ धावा
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (१) – ३५ चेंडूत ५५ धावा
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२)- ६ चेंडूत १० धावा
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (३)- ४ चेंडूत १ धाव
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (१)- ५६ चेंडूत ५१ धावा
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२)- २८ चेंडूत ५७ धावा
- भारत विरुद्ध पाकिस्तान (विश्वचषक) – ८ चेंडूत ४ धावा
- भारत विरुद्ध नेदरलँड (विश्वचषक) – १२ चेंडूत ९ धावा
के. एल राहुलवर नेटकरी भडकले
IND vs NED: “मी मैदानात येताच कोहली भाऊ.. ” सूर्यकुमार यादवने सांगितलं तुफानी खेळीचं गुपित
दरम्यान, के. एल राहुलने आजच्या सामन्यात रिव्ह्यू न घेण्यावरूनही अनेक चाहते व क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. के. एल राहुलच्या खेळाचा फॉर्म तात्पुरता बिघडला असला तरी उपकर्णधार पदी असल्याने त्याच्यावर अधिक टीका होत असावी. टी २० विश्वचषकात आता ३० ऑक्टोबरला के. एल. राहुल काय कमाल करून दाखवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.