भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या आपल्या ‘सुपर १२’ च्या अंतिम सामन्यामध्ये ७१ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासहीत भारताने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे. भारताने सर्वाधिक म्हणजेच आठ गुणांची कमाई करत टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या गटामध्ये अव्वल स्थान कायम राखत प्रवेश केला आहे. भारताचा पुढील सामना आता इंग्लंडविरोधात १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवल्यानंतर भारतीय संघांला इथपर्यंत घेऊन येण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या विराट कोहलीने अगदी एका शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विराटने केलेलं हे एका शब्दाचं ट्वीट तासाभरामध्ये दहा हजारांहून अधिक वेळा रिट्वीट करण्यात आलं आहे.
नक्की वाचा >> Ind vs Eng T20 World Cup Semifinal: भारत १० तारखेला इंग्लंडशी भिडणार! आकडेवारीचा कौल भारताच्या बाजूने
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या रोहितच्या संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही. रोहित शर्मा झटपट बाद झाल्यानंतर के. एल. राहुल आणि विराट कोहलीने डावाला आकार दिला. मात्र विराटही मोठा फटका मारण्याच्या नादात २५ चेंडूंमध्ये २६ धावा करुन झेलबाद झाला. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट तुलनेनं लवकर बाद झाला. या स्पर्धेमध्ये विराटने आतापर्यंत तीन अर्धशतकं ठोकली आहे. विराट बाद झाल्यानंतर सुर्यकुमार यादवने तुफान फलंदाजी करत २५ चेंडूमध्ये नाबाद ६१ धावा केल्या. भारताने या कामगिरीच्या जोरावर धावफलकावर १८६ धावांपर्यंत मजल मारली.
नक्की वाचा >> World Cup Final: भारत जिंकला! पाकिस्तानही उपांत्य फेरीत; Ind vs Pak ड्रीम फायनल्सची शक्यता वाढली; समजून घ्या नेमकं गणित
१८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कमकुवत फलंदाजी असलेला झिम्बाब्वेचा संघ संपूर्ण २० षटकंही मैदानात टिकू शकला नाही. भारताने दिलेलं १८७ धावांचं आव्हान झिम्बाब्वेच्या फलंदाजांना झेपलं नाही आणि संपूर्ण संघ २० षटकांचा खेळ पूर्ण करण्याआधीच ११५ धावांवर तंबूत परतला. या विजयासहीत भारताने दुसऱ्या गटात अव्वल स्थान कायम राखत प्रवेश केल्याने उपांत्य फेरीमध्ये भारत इंग्लंविरोधात मैदानात उतरणार आहे. तर दुसऱ्या गटातील न्यूझीलंड अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे.
नक्की वाचा >> World Cup 2022: “…तोच संघ वर्ल्डकप जिंकेल”; भारतीय संघाचा उल्लेख करत Semi-Finals आधी स्टुअर्ट ब्रॉडचं सूचक विधान
भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयासहीत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केल्यानंतर विराटने या सामन्यातील चार फोटो पोस्ट केले आहे. यापैकी एका फोटोत तो विराटबरोबर विकेटचं सेलिब्रेशन करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत हार्दीक पंड्याच्या खांद्यावर हात ठेऊन हसताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोत सूर्यकुमार यादव फटकेबाजी करताना दिसतोय तर चौथ्या फोटोत विराट आणि राहुल एकत्र फलंदाजी करतानाचा एक क्षण कॅमेरात कैद झाल्याचं दिसत आहे. हे फोटो शेअर करताना विराटने एका शब्दाची कॅप्शन दिली आहे. उजवीकडे जाणारा बाण आणि भारतीय तिरंग्याच्या इमोजीमध्ये हॅशटॅग वापरुन सेमीफायनल्स शब्द लिहिला आहे. #semifinals अशी कॅप्शन विराटने दिली आहे.
भारत आणि इंग्लंडमध्ये उपांत्य फेरीचा सामना १० तारखेला अॅडलेडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. तर पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यानचा उपांत्य फेरीतील पहिला सामना हा ९ तारखेला खेळवला जाणार आहे.