बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शकीब अल हसन याने भारताला टी२० विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले. पुढे तो म्हणाला की, “बुधवारच्या सामन्यात टीम इंडियाविरुद्धचा सामना जिंकून गुणतालिकेत मोठा बदल करण्याचा प्रयत्न असेन. भारत आणि बांगलादेश यांच्यात बुधवार, २ नोव्हेंबर रोजी अॅडलेड ओव्हलवर एक रोमांचक सामना रंगणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यासाठी शाकिबने आपल्या संघाला अंडरडॉग म्हटले आणि म्हणाला, “भारत फेव्हरेट आहे. ते येथे विश्वचषक जिंकण्यासाठी आले आहेत. जर आम्ही त्यांना हरवले तर ते त्यांच्यासाठी अपसेट असेल आणि आम्ही त्यांच्याविरुद्ध मोठा अपसेट करण्याचा प्रयत्न करू. “आम्ही या सामन्यात फेव्हरेट म्हणून खेळणार नाही.” त्यांनी भारतीय संघाचे कौतुक केले आणि सांगितले की त्यांच्याकडे सर्व सामने जिंकून देणारे खेळाडू आहेत आणि त्यांना उपांत्य फेरीत जाण्यासाठी दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे.”

हेही वाचा :   T20 World Cup: श्रीलंकेचा सहा गडी राखून विजय, या पराभवाने अफगाणिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर

“सुर्यकुमार यादव खरोखरच चांगला खेळत आहे. तो सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. मी प्रथमच अर्शदीपला आयपीएलमध्ये पाहिलं आणि सध्या तो खरोखरच चांगली गोलंदाजी करत आहे. आमच्या संघाच्या बैठका झाल्या नाहीत पण आम्ही करू आणि त्यात वेगवेगळ्या योजना आखू जेणेकरून सामन्यात आम्हाला फायदा होईल. त्यातील काही योजना काम करतील आणि काही नाही करणार, कारण हा खेळच असा आहे.”

तुम्हाला माहिती असेलच की बांगलादेशने २००७ साली टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचषकातून साखळी सामन्यात हरवत बाहेर काढले होते. तसेच २०१६ साली देखील फक्त एका धावेने भारताचा विजय झाला होता नाहीतर त्यावेळी देखील टीम इंडिया उपांत्य फेरी आधी बाहेर पडली असती.

हेही वाचा :  कार्तिकच्या हकालपट्टीवर मुख्य निवडकर्त्यांनी काय म्हटले? पृथ्वी शॉ-सरफराजच्या निवड न करण्याबाबतही केले विधान 

सुपर-१२ मधील आतापर्यंतचा प्रवास

या टी२० विश्वचषकाबाबत बोलायचे झाले तर टीम इंडियाचा हा चौथा सामना आहे. भारताचा आतापर्यंत सुपर-१२ टप्प्यात पाकिस्तान, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिकेशी सामना झाला आहे. टीम इंडियाने पाकिस्तान-नेदरलँडचा पराभव केला आहे, तर दक्षिण आफ्रिकेने पराभूत केले आहे. बांगलादेशनेही या विश्वचषकात आतापर्यंत तीन सामने खेळले असून त्यात दोन जिंकले आहेत. बांगलादेशने नेदरलँड्स आणि झिम्बाब्वेचा पराभव केला आहे, तर दक्षिण आफ्रिकेकडून त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. मात्र, त्यांचे दोन कठीण सामने म्हणजे भारत आणि पाकिस्तान अजून यायचे आहेत. टी२० विश्वचषक २०२२ च्या गुणतालिकेत, भारत-बांगलादेश सध्या समान गुणांसह आहेत, दोघांच्या नेट-रन रेटमध्ये फरक आहे. अशा स्थितीत बांगलादेशने काही अपसेट केले तर टीम इंडियासाठी सेमीफायनलचा रस्ता कठीण होऊ शकतो.