T20 World Cup Semi Finals, IND vs ENG: इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने टी-20 विश्वचषकाच्या भारत विरुद्ध इंग्लंड या दुसऱ्या सेमी फायनल सामन्याच्या आधी नाराजीचा सूर धरून आयसीसीवर मोठा आरोप लावला आहे. तारुबा येथील ब्रायन लारा स्टेडियमवर पहिला उपांत्य सामना ‘सुपर आठ गट १’ मध्ये अव्वल खेळाडू (भारत) आणि गट 2 उपविजेता (इंग्लंड) यांच्यात व्हायला हवा होता, परंतु त्याऐवजी, तो गट २ चा विजेता संघ दक्षिण आफ्रिका व गट १ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अफगाणिस्तान यांच्यात झाला असं करून आयसीसी भारताच्या सोयीने वागत असल्याचा आरोप वॉनने लावला आहे.

आयसीसी घेतंय भारताची बाजू? पण कशावरून?

सुपर आठमधील क्रमवारीचा विचार न करताच भारत दुसरा उपांत्य सामना गयानामध्ये खेळणार हे निश्चित करण्यात आले. आयसीसीने त्यासाठी कोणतेही वैध कारण दिलेले नाही. यातून हेच दिसून येतं की ही सोय भारतातील दर्शकांसाठी केली गेली आहे. पहिला उपांत्य सामना २६ जूनला रात्री म्हणजे भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरू होणार होता, जो भारतातील दर्शकांसाठी आदर्श वेळ नाही. तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना हा दिवसाचा खेळ असून २७ जूनला भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होणार होता. जो भारतात व्ह्यूअरशिपचा प्राईम टाइम आहे. इतकंच नाही तर भारताचे विश्वचषकातील सर्व सामने हे दिवसाचेच खेळ होते, म्हणजे भारतात रात्री ८ वाजता सामना असणार हे निश्चित असायचं. याउलट इतर संघांना रात्रीचे सामने खेळावे लागले.

Kapil Dev Remark On Virat Kohli & Rohit Sharma
“विराट कोहली १५० किलोचे डंबेल उचलतो, पण रोहित शर्माचा एक पॅक..”, कपिल देव यांचं मोठं विधान; म्हणाले, “मर्यादांची..”
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Rohit Sharma
“ऑस्ट्रेलियाचा संघ आता…”. रोहित शर्माने एका वाक्यात व्याजासकट बदला घेतला; हिटमॅन स्टाईल उत्तराचा VIDEO व्हायरल
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
IND vs ENG Rohit Sharma Press Conference
IND vs ENG: रोहित शर्माच्या मनात एकच चिंता; T20 WC सेमीफायनलआधी स्वतः म्हणाला, “सामना उशिरापर्यंत चालला तर..”
Saurabh Netravalkar Straight Answer About Working After T20 World Cup
सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…

काय म्हणाला मायकल वॉन?

उपांत्य फेरीत यामुळे काहीशी अन्यायकारक स्थिती निर्माण झाली आहे. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस होता, परंतु भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकही दिवस राखीव नाही. सुपर आठमध्ये भारताचे स्थान अधिक भक्कम असल्याने, समजा गुयानामधील खराब हवामानामुळे सामना झालाच नाही तर आपोआप भारतच अंतिम फेरीत जाईल. याविषयी वॉनने X वर लिहिले की, “नक्कीच हा सेमीफायनल सामना गुयाना इथे असायला हवा होता.. पण संपूर्ण कार्यक्रम भारताच्या दिशेने असल्यामुळे इतरांवर अन्याय होत आहे.. #T20IWorldCup,”

हे ही वाचा<< IND vs ENG: रोहित शर्माच्या मनात एकच चिंता; T20 WC सेमीफायनलआधी स्वतः म्हणाला, “सामना उशिरापर्यंत चालला तर..”

वॉनचं भारत प्रेम स्पष्ट पण तरीही आक्षेप..

दक्षिण आफ्रिकेने ११.५ अफगाणिस्तानला टी-20 विश्वचषक उपांत्य फेरीतील सर्वात कमी धावसंख्येत (५६) पूर्ण बाद केल्यानंतर इंग्लंडच्या माजी फलंदाजाची ही पोस्ट समोर आली आहे. उल्लेखनीय म्हणजे, टी-20 विश्वचषकात वेळापत्रकाचा मुद्दा उपस्थित करणारा वॉन हा पहिला माजी क्रिकेटपटू नाही. इंग्लंडचा माजी फलंदाज डेव्हिड लॉयडनेही भारताची बाजू घेण्यासाठी आयसीसीवर निशाणा साधला होता. विशेष म्हणजे, मायकेल वॉन क्रिकबझचा एक्सपर्ट म्हणून भारतात असतो. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये राहतो. ऑर्मिन्स्टन रोडवर दीनदयाळ नावाच्या माणसाकडे रस्त्यावर बसून दाढी आणि मसाज करुन घेतो, भारताविषयी विशेष प्रेम असूनही वॉनने घेतलेला आक्षेप हा भुवया उंचावणारा आहे.