बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ रविवारी (३० ऑक्टोबर) पर्थ स्टेडियमवर नेदरलँड्सविरुद्ध टी२० विश्वचषकाच्या २९व्या सामन्यात खेळणार आहे. पाकिस्तानसाठी हा सामना ‘करा किंवा मरो’सारखा आहे. त्याची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता कमी आहे. बाबरच्या नेतृत्वाखालील संघाला इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहण्याव्यतिरिक्त उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील. हा महत्त्वाचा सामना पर्थ स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वाजल्यापासून खेळवला जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दुसरीकडे, नेदरलँड संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. अशा परिस्थितीत तिला पाकिस्तानविरुद्ध टी२० विश्वचषकात पहिला विजय नोंदवायचा आहे. या सामन्यात जो संघ हरेल तो अधिकृतपणे उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर जाईल. पाकिस्तानच्या संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. पहिल्या सामन्यात भारताकडून तर दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेकडून त्यांचा पराभव झाला होता. पाकिस्तान आणि नेदरलँडचे संघ ग्रुप बी च्या गुणतालिकेत अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.

त्यातच नेदरलँड्स संघाचे मुख्य प्रशिक्षक यांनी खूप मोठे विधान करत एकप्रकारे त्यांनी पाकिस्तान संघाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, “मला वाटतं प्रत्येक संघाला आपण खेळतो तो सामना जिंकायचा असतो. पण आम्ही स्पष्टपणे पाहिले आहे की पाकिस्तान संघाला पराभूत करणे तितकेसे अवघड नाही, आणि हे लक्षात ठेवणे संघासाठी उभारी देणारे आहे. साहजिकच, त्यांच्यासोबत नेदरलँड्समध्ये फार पूर्वी वर्ल्ड सुपर लीगमध्ये खेळल्यामुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला आहे. आम्ही त्या सामन्यांमध्ये अगदी जवळ जाऊन सामना चुरशीचा केला होता. यावेळी एक पाऊल आणखी पुढे टाकत सामना जिंकण्याची आशा आहे. आणि असे घडले तर ते संघासाठी खूप फायद्याचे होईल.”

हेही वाचा :  इथेच टीम इंडिया ३६ वर ऑल आउट झाली होती पण.. गावस्करांनी बाबर आझमला धीर देत सांगितला ‘तो’ किस्सा 

बाबरच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने टी२० विश्वचषकाच्या सुरुवातीला नेदरलँड्सचा दौरा केला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत माजी विश्वविजेतत्यांनी नेदरलँड्सवर ३-० असा विजय नोंदवला होता. भारत आणि झिम्बाब्वे यांच्याकडून एकामागोमाग एक सामना गमावल्यानंतर, पाकिस्तानला टी२० विश्वचषक स्पर्धेत त्यांचे आव्हान कायम राखण्यासाठी उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील.

हेही वाचा :   IND vs SA T20 World Cup 2022: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात पाऊस घालणार का गोंधळ, जाणून घ्या

नेदरलँड्सचे प्रशिक्षक कूक पुढे म्हणाले. “आमच्या संघातील गोलंदाजी आक्रमण चांगले आहे, आणि आशा आहे की आम्ही पाकिस्तानच्या वरच्या फळीतील फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी होऊ. पाकिस्तानच्या संघाकडे खूप वेगवान गोलंदाज आहेत आणि आम्ही त्यांचा सामना याआधी केला आहे, त्यामुळे त्यांनी कितीही वेगवान गोलंदाजी केली तरी आम्ही त्याला उत्तर देण्यात सक्षम आहोत.”