आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ च्या ३३व्या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने आहेत. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने ब्रिस्बेनच्या द गाबा स्टेडियमवर नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने २० षटकांत ६ बाद १७९ धावा केल्या. त्याच्यासाठी जोस बटलरने ४७ चेंडूत ७३ धावा केल्या. त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले. इंग्लंडला हा सामना जिंकणे अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर ते या विश्वचषकातून बाहेर पडू शकतात त्यांचे आव्हान आजच संपुष्टात येऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जॉस बटलरचे आंतरराष्ट्रीय टी२० मधील हे १८ वे अर्धशतक आहे. अॅलेक्स हेल्सनेही अर्धशतक केले. तो ४० चेंडूंत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५२ धावा करून बाद झाला. बटलर आणि हेल्स यांनी पहिल्या विकेटसाठी १०.२ षटकांत ८१ धावांची भागीदारी केली. दोघांनी ५ षटकात ४० धावांची भागीदारी केली. इंग्लंडने १६ षटकांत २ बाद १३७ धावा केल्या होत्या. त्याने १० षटकात एकही विकेट न गमावता ७७ धावा केल्या.

लियाम लिव्हिंगस्टोनने १४ चेंडूत २० धावा केल्या आणि तो फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. न्यूझीलंडसाठी लॉकी फर्ग्युसन सर्वात यशस्वी ठरला. त्याने ४५ धावांत २ बळी घेतले. त्याच वेळी, ईश सोधी सर्वात किफायतशीर असल्याचे सिद्ध झाले. त्याने ४ षटकात २३ धावा दिल्या आणि एक विकेटही घेतली.

हेही वाचा :बेबी एबीचे तुफानी शतक! टायटन्स संघाकडून फलंदाजी करताना केली विस्फोटक खेळी

स्पर्धेतील आपला प्रवास सुरू ठेवण्यासाठी इंग्लंडला न्यूझीलंडला कोणत्याही परिस्थितीत हरवावे लागेल. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात शेवटच्यावेळी झालेल्या सामन्यात अबुधाबीमध्ये केन विल्यमसनच्या संघाने उपांत्य फेरीत इंग्लंडला २०२१ च्या टी२० विश्वचषकातून बाहेर काढले होते. डकवर्थ लुईस पद्धतीच्या आधारे आयर्लंडविरुद्ध अनपेक्षितपणे पराभव झाल्यामुळे आणि पावसामुळे ऑस्ट्रेलियासोबत गुण वाटून घेतल्याने इंग्लंडचे सुरुवातीच्या ३ सामन्यांतून ३ गुण झाले आहेत. याचा अर्थ हा सामना आता जॉस बटलर आणि त्याच्या संघासाठी करो किंवा मरो असा सामना आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup jos buttlers brilliant half century puts england ahead of new zealand by 180 runs avw