आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारतीय संघाने आपली विजयी घौडदौड सुरूच ठेवली आहे. गुरुवारी (२७ ऑक्टोबर) सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँड्सचा ५६ धावांनी पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयासह भारत २ गटातील गुणतालिकेत नंबर-१ वर पोहोचला आहे. पण भारतीय संघाच्या या विजयात सूर्यकुमार यादवने महत्त्वाची भूमिका बजावली. आता टीम इंडियाचा तिसरा सामना ३० ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
सूर्यकुमार यादवने अवघ्या २५ चेंडूंत ५१ धावांची नाबाद खेळी खेळली, ज्यात सात चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या खेळीसाठी सूर्यकुमार यादवला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पुरस्कार देतेवेळी सुर्याने आपल्या वागण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खरं तर, जेव्हा त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं तेव्हा सूर्या चाहत्याला म्हणाला, ‘लाओ भैया दे दो.’ सूर्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सुर्यकुमार यादवचा हा अभिनय त्याच्या सर्व चाहत्यांना आवडला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जेव्हा सूर्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले तेव्हा भारतीय फलंदाजाने चाहत्याला म्हटले- ‘लाओ भैया दे दो’. मिस्टर ३६० डिग्री ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या सूर्यकुमार यादवची ही स्टाइल चाहत्यांना खूप आवडली आहे.
तत्पूर्वी, सूर्यकुमार यादवने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर कोहलीने सूर्याला प्रोत्साहन दिले आणि दोन्ही खेळाडूंनी हात वर करून आणि बॅट उंचावून आनंद साजरा केला. दोघांचा अशा प्रकारे सेलिब्रेशन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सामन्याबाबत बोलायचे झाले तर भारताने प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्ससमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात नेदरलँड संघाला निर्धारित २० षटकात ९ गडी गमावून केवळ १२३ धावा करता आल्या आणि ५६ धावांनी सामना गमावला.